Home राजकारण मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचे सानंदांनी केले स्वागत

मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचे सानंदांनी केले स्वागत

कार्यक्रमानिमित्त खामगांवला येण्याचे दिले निमंत्रण
खामगाव : राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे ‘लोणार सरोवर संवर्धन’ व विकासकामांबाबत सादरीकरण निमित्त बुलडाणा जिल्हयातील लोणारला आले असता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचे खामगांव मतदार संघाच्या वतीने पुश्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना खामगाव मतदार संघात हजारो लोकांच्या उपस्थितीत काॅंग्रेससह महाविकास आघाडीचा कार्यकर्ता व शेतकरी बांधवांचा महामेळावा तसेच खामगाव मतदार संघाच्या वतीने जाहीर सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमूल्य वेळ देण्याबाबत निमंत्रण दिले असता मुख्यमंत्री महोदयांनी खामगांव येथे महाविकास आघाडीच्या महामेळाव्याला येण्याचे मान्य केले.यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे ,बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समितीचे अध्यक्ष ना.संजय रायमुलकर,आमदार संजय गायकवाड,बुलडाणा जि.प.च्या अध्यक्षा सौ.मनिशाताई पवार, खामगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुशार चंदेल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here