Home प्रेरणदायी रक्तदान करून 193 युवकांनी दिल्या लाडक्या आ. आकाशदादांना शुभेच्छा    

रक्तदान करून 193 युवकांनी दिल्या लाडक्या आ. आकाशदादांना शुभेच्छा    

खामगाव::- भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे वाढदिवस च्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.         या शिबिराबाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ शिक्षण मंडळाचे सचिव प्रा प्रशांतदादा बोबडे होते. तर प्रमुख उपस्थितीत सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी , जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, विजय भालतीडक, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानोकार, पप्पूसेठ अग्रवाल,चदुसेठ मोहता , संतोषसेठ डीडवानी, जेष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, दर्शनसिंग ठाकूर, ओंकारअप्पा तोडकर, बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे, विनोद टिकार, राकेश राणा न प सदस्य तथा भाजयुमो जिल्हा सरचिटणीस, भाजयुमो शहर सरचिटणीस नागेंद्र रोहनकार  भाजप विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड,, भाजप युवती आघाडी शहराध्यक्ष  सौ स्नेहा चौधरी, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख  आदी मान्यवरांची उपस्थिती होती. भाजयुमो खामगाव शहर, विध्यार्थी आघाडी, युवती आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात 193 युवकांनी रक्तदान केले. दरवर्षी आयोजित। भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली  होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. तसेच आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी वर्षीपेक्षा या वर्षी तिप्पट नागरिकांनी गर्दी केली. यावेळी भाजयुमो, विद्यार्थी आघाडी, युवती मोर्चा, आदी खामगाव शहर भाजप आघाड्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शेखर कुलकर्णी व रघुनाथ खेरडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राम मिश्रा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here