Home Breaking News आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते “विकासयात्री ” चे विमोचन

आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते “विकासयात्री ” चे विमोचन

खामगाव :भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या विकासकार्यावर आधारित द रिपब्लिक महाराष्ट्र “विकासयात्री ” पुस्तकाचे विमोचन होणार आज पार पडले. आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून साकारलेल्या या विशेष पुस्तकाचे विमोचन त्यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत माधव नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात सकाळी १० वाजता थाटात करण्यात आले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदादा मोहिते, बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे, विहीपचे राजूभाऊ राजपूत, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, कुणबी समाजदूतचे संपादक अनिल खोडके, नगरसेवक राजेंद्र धनोकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, रामराज्यचे कार्यकारी संपादक सतेंद्र ठाकूर, द रिपब्लिकचे संपादक श्रीधर ढगे पाटील, अतिथी संपादक पांडुरंग काळे, एकनाथराव पाटील, चेतन ठोंबरे, नीलेश बरदिया, रघुनाथ खेर्डे यांच्या या विशेष पुस्तकात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी खामगाव मतदार संघात केलेल्या अफाट विकासकार्यावर प्रकाश टाकणारे तसेच त्यांचेववरील मान्यवरांचे लेख प्रकाशीत केलेले आहे. तरी आमदार अँड आकाशदादा फुंडकर प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन द रिपब्लिक महाराष्ट्र चे संपादक श्रीधर ढगे पाटील व अतिथी संपादक पांडुरंग काळे यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष शुभेच्छा !

द रिपब्लिक महाराष्ट्रच्या वतीने आमदार ऍड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक स्वरूपात, आर्ट पेपरवरील ४४ पानांचा बहुरंगी विशेषांक प्रकाशित करण्यात आले. या अंकासाठी माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्र दिले, या पत्रात त्यांनी आमदार आकाश फुंडकर यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. फडणवीस यांचे पत्र विकास यात्री अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.

-टीम द रिपब्लिक महाराष्ट्र
www.therepublic.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here