Home Breaking News आमदार फुंडकर पोलिसांच्या ताब्यात ; वाढदिवसीच अटक?

आमदार फुंडकर पोलिसांच्या ताब्यात ; वाढदिवसीच अटक?

खामगाव: भारतीय जनता पार्टीतर्फे 5 फेब्रुवारी 2021 रोजी राज्यभरातील सर्व महावितरणचे कार्यालये, उपकेंद्र हयांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलनाची हाक देण्यात आली होती, दरम्यान वीज कार्यालयास टाळा बंद आंदोलन करण्यासाठी गेलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड आमदार फुंडकर यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आज वाढदिवस असल्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतककांची शहरात गर्दी आहे.

“माझा वाढदिवस महावितरणच्या सर्व कार्यालये व उपकेंद्रांना “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करुन साजरा करण्यात यावा” असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांनी केले होते.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सर्व क्षेत्रात अत्यंत बेजाबदार व अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यातल्या त्यात महावितरणच्या कामकाजाचा पुर्ण गोंधळ उडाला आहे. महाविकास आघाडी सरकारने विज देयके कमी करण्यात येतील 100 युनिट वापरा पर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात आली नाहीतच शिवाय सर्व विद्युत ग्राहकांना अव्वाच्यासव्वा बिले आकारण्यात आली असून त्यांची तुघलकी वसुली राज्य सरकारव्दारा करण्यात येत आहे. वीज देयके माफी नाही उलट दिलेली वीज देयके हे भरावेच लागतील असे सुध्दा राज्याचे उर्जा मंत्री यांनी जाहीर केले. संपुर्ण महाराष्ट्रातील 78 लाख वीज कनेक्श़न कापण्याचे काम सरकारव्दारे सुरु आहे. या विरोधात रोहित्रामध्ये टाकायला महाभकास आघाडीच्या कार्यकाळात तेल नाही. कृषी पंपाची रोहित्रे सतत जळतात व ती बदलून मिळत नाहीत. विज पुरवठा नियमीत होत नाही. कमी अधीक दाबामुळे विद्युत उपकरणे जळतात. महावितरणचे अधिकारी ग्राहकांना सन्माननीय वागणुक देत नाही असा आरोप करीत 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते हयांनी आपापल्या भागातील महावितरणच्या सर्व कार्यालयावर, उपकेंद्रावर “टाळा बंद व हल्ला बोल” आंदोलन करावे असे आवाहनही आमदार फुंडकर यांनी केले होते. दरम्यान महावितरणच्या खामगाव कार्यालयासमोट टाळे ठोको करण्यास गेलेल्या ॲड. आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्ते सुद्धा स्थानबद्ध करण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे आज फुंडकर यांचा वाढदिवस आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here