Home Breaking News गांजा तस्करीचे खामगाव कनेक्शन

गांजा तस्करीचे खामगाव कनेक्शन

खामगाव : येथून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातून अवैधरित्या तस्करी केल्या जाणारा गांजा शिवाजीनगर पोलिसांनी आज गुरुवारी पकडला आहे.

खामगाव शहरात शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आंध्रप्रदेश मधून पिंपळगांव राजा कडे घेऊन जात असलेला अवैधरीत्या गांजा एमआयडीसी मधून वाहतुक करताना जप्त केला आहे. एपी-२७-क्यु-६१३३ या महिंद्रा मॅक्स या गाडीमधून अवैधरित्या गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती, त्याच्या आधारे वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून स्थानिक एमआयडीसी पोलीस चौकी समोर गांजा घेऊन जाणारे वाहन पकडले आहे. यामधून गांजाचे ५ पोते वजन ८५ किलो अंदाजे किंमत २ लाख ५५ हजार व चारचाकी वाहनासह ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .शिवाजी नगर पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.व पुढील कार्यवाही शिवाजीनगर पोलीस करत असल्याची माहिती ठाणेदार सुनील हुड यांनी न दिली आहे. खामगावात परप्रांततून गांजा येत असून हे काम करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलल्या जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here