Home खामगाव विशेष आ. अँड आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित “विकासयात्री” विशेषांकाचे उद्या विमोचन

आ. अँड आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित “विकासयात्री” विशेषांकाचे उद्या विमोचन

खामगाव :भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या विकासकार्यावर आधारित द रिपब्लिक महाराष्ट्र “विकासयात्री ” पुस्तकाचे विमोचन होणार आहे. आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून साकारलेल्या या विशेष पुस्तकाचे विमोचन त्यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत माधव नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात सकाळी ९ वाजता होणार आहे. या विशेष पुस्तकात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी खामगाव मतदार संघात केलेल्या अफाट विकासकार्यावर प्रकाश टाकणारे तसेच त्यांचेववरील मान्यवरांचे लेख प्रकाशीत केलेले आहे. तरी आमदार अँड आकाशदादा फुंडकर प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन द रिपब्लिक महाराष्ट्र चे संपादक श्रीधर ढगे पाटील व अतिथी संपादक पांडुरंग काळे यांनी केले आहे.

आभार मानावे तेवढे कमीच!

आम्ही द रिपब्लिक महाराष्ट्र हे वेबपोर्टल 1 जानेवारी रोजी रन केलं, या नावाने साप्ताहिक सुद्धा सुरू करत आहोत. कोणत्याही लहान माध्यमाला स्पर्धेत टिकण्यासाठी जाहिरातीचा आधार लागतो. जाहीरात मिळवणं व नंतरची सर्व प्रकिया तारेवरची कसरत. वाचक सेवाभाव आणि दोन वेळच्या प्रपंचासाठी हे सारे कष्ट आम्ही घेत असतो. त्यासाठी राजकीय नेते, मान्यवरांचे वाढदिवस, दिवाळी, वर्धापनदिन असे निमित्त असते. आम्ही सुद्धा असा प्रयोग केला निमित्त होते खामगाव मतदार संघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसाचे.
द रिपब्लिक महाराष्ट्रच्या वतीने आमदार ऍड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक स्वरूपात, आर्ट पेपरवरील ४४ पानांचा बहुरंगी विशेषांक काढला, त्यास चांगला प्रतिसाद लाभला. या कामात हितचिंतक, जाहीरात व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच!
प्रांजळ हेतू, प्रामाणीक पत्रकारिता असली की लोक डोक्यावर घेतात, हे पुन्हा सिध्द जाहले!

-टीम द रिपब्लिक महाराष्ट्र
www.therepublic.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here