क्षमा करा बापू !
———————
चला तर आता आपली
योजना झाली एकदम पक्की
मी ऊपोषणाची घोषणा करतो
तुम्ही समजवायला या बरं नक्की
आपल्या अंगावर येणार नाहीत
असे मी नाराजीचे वाचेल पाढे
तुम्ही गंमतगंमत मनधरणी करा
मी गंमतगंमत घेईल आढेवेढे
तुम्ही गंमतचं मागण्या मान्य करा
म्हणा जिव कशाला टांगता ?
ऊपोषणापूर्वीच निंबुपाण्याने
आपण करूनच टाकु सांगता
ॲक्शनप्लॅन तयार आहे
चला भरपूर प्र’सिध्दी’ लाटू
क्या बात है ! द्या टाळी
घोषणा केल्यावर पून्हा भेटू
हा बहूरूप्यांचा प्रांत
तर तो ठकसेनांचा टापू
चालली तुमच्या नावावर दुकानदारी
क्षमा मागतो ! माफ करा बापू
ॲड्. अनंत खेळकर
अकोला