Home Breaking News प्रदीप राठी यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन

प्रदीप राठी यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन

खामगाव : येथील टेंभुर्णा शिवारातील कोट्यवधी किंमतीचे १४ प्लॉट असलेल्या भूखंडाला बनावट खरेदी खत तयार करून स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांमगाव शहर पोलिसात बनावट खरेदी तयार करणाऱ्या भू माफिया प्रेम रेसिडेन्सी हॉटेलचे संचालक प्रदीप प्रेमसुखदास राठी याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते
या प्रकरणी आज न्यायालयाने प्रदीप राठी यांना सशर्त तातपुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
येथील प्लॉट खरेदी-विक्री व्यावसायिक लवकेश सोनी यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला होता. लवकेश सोनी यांनी सन २००० साली वल्लभदास राठी यांच्याकडून टेंभुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २४ मधील १० प्लॉट विकत घेतले होते. तसेच लक्ष्मण निमकर्डे यांच्याकडून ४ प्लॉट, असे एकूण १४ विकत घेतले होते. दरम्यान, प्रेम रेसिडेन्सी हॉटेलचे संचालक आरोपी प्रदीप प्रेमसुखदास राठी याने या १४ प्लॉटची सन २००४ मध्ये मृतक लवकेश सोनी यांच्याकडून खरेदी खत दस्त क्रमांक १५३०ने खरेदी केल्याचे दाखवीत सदर प्लॉटवर आपल्या नावांची नोंद केल्या.मृत लवकेश सोनींकडून खरेदी खताने खरेदी केल्याचे दाखवीत या प्लॉटवर आरोपी राठीने आपल्या नावाची नोंद केल्या बाबतची माहिती तक्रारदार मृत लवलेश सोनी यांच्या पत्नी अंजू सोनी यांना कळाली. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता आरोपी राठी याने घरीच खोटे शासकीय मुद्रांक, वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे पदाचे खोटे शिक्के व त्यांच्या खोट्या सह्या करून खरेदी खत तयार ते मुद्रांक फ्रॅंकींग करून दस्तऐवज तयार केला. दस्तऐवज खरा असल्याचे भासवून सदरचे १४ प्लॉटची स्वतःच्या नावांची नोंद करून घेतली. एवढेच नव्हे तर यातील काही प्लॉट दुसऱ्यांना विकले. अंजू सोनी यांनी याबाबत दस्तऐवज क्रमांकाची दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता ते दस्त क्रमांक १५३० वर प्रदीप राठीची नावाची नोंद आढळून आली नाही. त्या दस्त क्रमांकावर दुसऱ्याच व्यक्तीची व दुसऱ्या जमिनीची खरेदीखत करण्यात आल्याचे समोर आले.तक्रारदार अंजू सोनी यांच्या तक्रारीवरून खामगांव शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप राठी विरुद्ध कलम ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४७५, २५५, २६०,तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००६ नुसार ६६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.प्रदीप राठी यांनी येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन करिता अर्ज दाखल केले असता वि. न्यायालयाने प्रदीप राठी यांना सशर्त तातपुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राठी यांचे तर्फे अँड. वि. आर. अग्रवाल, नितिन अग्रवाल, बाबू भट्टड यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here