खामगाव : औरंगाबाद कडून खामगाव कडे येणाऱ्या सेलोटास भरधाव गाडीने समोरील ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रिंट वेल ऑफसेटचे संचालक प्रवीण माळी व 52 सौ स्वाती माळी वय45 ,सुहानी जैन वय17, हेमानी आनंद जैन वय15, आनंद रमेश चंद्र जैन वय 45 , प्रीती आनंद जैन वय40 सर्व राहणार फरशी हे जखमी झाले आहेत.
रात्री दोन वाजताच्या सुमारास जर अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.
सर्व जखमींना खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले आहे एम. एच. 28 के बी के 0477 या गाडीने माळी व जैन कुटुंब औरंगाबाद वरून खामगाव कडे परत येत असताना सदर चा अपघात झाला आहे अंतर फाट्याजवळ घडलेले अपघातातील जखमींना सिल्वर सिटी रुग्णालयातून औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये जावून आमदार आकाश फुंडकर, विनोद टिकार, सतिषआपा दुडे यांच्यासह मित्र मंडळीने त्याच्या प्रकृती विषयी विचारपूस केली.