पिंपळगाव राजा : जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत भव्यदिव्य राममंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली असून मंदिराच्या निर्माण कार्याला हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन खामगाव अर्बन बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी संजयजी पांडे,ज्ञानेश्वर फाटे,रामेश्वर कराळे,जि.प.सदस्य पुंडलिक बोंबटकार यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबविण्यात आले.येथील अनेक नागरिकांनी या अभियानात सहभागी होत श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी करीता निधी समर्पित केला.पिंपळगाव राजा व परिसरातील नागरिकांनी या अभियानात उस्फुर्त सहभाग नोंदविला.खामगाव अर्बन बँकेच्या माध्यमातून या अभियानाची मुहूर्तमेड रोवली असून त्यादृष्टीने हा निधी संकलित करण्यासाठी कार्य सुरू आहे.या अभियानात मंदिराच्या नावाने नगदी रक्कम,चेक,डीडी स्वीकारण्यात येत आहे.
श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत भव्यदिव्य राम मंदिर उभारणी व्हावी ही प्रत्येकाची इच्छा होती. ती आता पूर्णत्वास जात आहेत.त्याकरिता देशात सर्वत्र निधी राम मंदिर निधी संकलित अभियान राबविण्यात येत आहे. याकरिता नागरिकानी स्वतःहून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्या नगरी कडून करण्यात आले आहे. यावेळी अभियान गतिमान करण्यासाठी श्रीराम भाऊ वानखडे, सूरज दुबे,दीपक नरवाडे,प्रशांत सारभूकंन हे स्वयंसेवक आपले योगदान देत आहेत.