Home विदर्भ नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश वाकोडे, उपाध्यक्ष प्रवीण डवंगे तर सचिवपदी...

नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश वाकोडे, उपाध्यक्ष प्रवीण डवंगे तर सचिवपदी प्रशांत पाटील

नांदुराः तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव जेष्ठ संपादक यशवंत पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ३१ जानेवारीला दुपारी ४ वाजता मोठ्या उत्साहात पार पडली
याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांमध्ये नूतन कार्यकारीणीच्या निवडीबाबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होवून अध्यधपदी शैलेश वाकोडे, उपाध्यक्ष प्रवीण डवंगे, सचिव प्रशांत पाटील (शेंबा), सहसचिव पुरुषोत्तम भातुरकर तर कोषाध्यक्षपदी वैभव काजळे आदींची एक वर्षाकरीता नवीन कार्यकारणीत सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी मावळते अध्यक्ष विनोद गावंडे , जेष्ठ पत्रकार सर्वश्री सुरेश पेठकर , भाऊसाहेब बावणे एकनाथ अवचार , किशोर खैरे, सुहास वाघमारे, विरेन्द्रसिंग राजपूत, राजेश काजळे, तुकाराम रोकडे ,महेश पांडे , विवेक पाऊलझगडे, संतोष तायडे , लहुजी गावंडे मोहन काजळे , विठ्ठल भातुरकर यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here