Home Breaking News अफलातून! कर्ज घेतले नसतांनाही खात्यावर बॅकेचा बोजा

अफलातून! कर्ज घेतले नसतांनाही खात्यावर बॅकेचा बोजा

मलकापूर:कोणत्याही प्रकारचे कर्ज उचलले नसतांनाही बॅकेने कर्ज थकबाकी लादल्याने शेतकऱ्यानेयाने धा.बढे पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.याबाबत खंडु बंडू शिंदे रा-पुन्हई यांनी दिलेल्या तव्रâारीत नमूद केले आहे की,माझी हनवतखेड ता. मोताळा येथे गट क्रमांक ४२ मध्ये २ हेक्टर ७२ आर अधिक १ आर पोटखराब अशी शेत जमीन आहे.सदर शेतजमीनीवर मी सन २०१२ मध्ये आय सि आय सि बँक बुलडाणा या बँकेकडून १,३०,००० रूपये कर्ज घेतलेले आहे. व या कर्जाशिवाय इतर कोणत्याही बँकेकडुन, पतसंस्थेकडुन वा इतर खाजगी वित्तिय संस्थाकडुन मी सदर मिळकतीवर कर्ज घेतलेले नाही. शासना मार्फत सन २०१९ मध्ये कर्ज माफीची योजना जाहीर झाली. त्याअनुशंघाने कैफियतदार हा दिनांक २९/०६/२०२० रोजी दुपारी ३ वाजुन १५ मिनीटां नी संगणकाच्या दुकानावर मोताळा येथे महात्मा ज्योतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ मध्ये आधार प्रमाणीकरण व कर्ज माफीमध्ये नाव आहे की नाही. याची चौकशी करण्याकरीता गेला असता त्याला आधार प्रमाणीकरण नोंद पावती मिळाली. व ती पाहील्यावर कैफियतदाराला धक्का बसला,कारण कैफियतदार याने कधिहि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिप्री गवळी यांचे कडुन कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते व नाही.तरी सुध्दा कैफियतदार यांचे नावावर १,१८,६४० रूपये सदर पावती मध्ये थकबाकी म्हणुन नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे कैफियतदार हा सदर बँकेमध्ये या कर्जाची चौकशी करण्याकरीता गेला असता सुरूवातीला काही दिवस गैर कैफियतदार १ याने कैफियतदार याला उडवा उडवीची उत्तरे देवून परत पाठविले. त्यामुळे कैफियतदार फसवणुक झाली त्याच्या लक्षात आले.त्यामुळे कैफियतदार याने दिनांक ०४.११.२०२० रोजी माहीती अधिकारा अंतर्गत सदर कर्ज प्रकरणाची माहिती बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिप्रीं गवळी यांचे कडे केली असता, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिप्रीं गवळी कैफियतदाराला दिनांक १४.१२.२०२० रोजी पत्र पाठवुन माहिती देवु शकत नाही असे पत्र पाठविले.वास्तवीक पाहता कुठल्याही प्रकारचे कर्ज कैफियतदाराने काढलेले नसतांना व कैफियतदार स्वत: बँकेमध्ये जाउन सुध्दा कुठल्याही प्रकाररची माहिती गैरकैफियतदार देण्यास तयार नाही. त्यामुळे कैफियतदाराची गैर कैफियतदार नंबर १ ते ३ यांनी संगणमत करून खोटे दस्त बनवुन व कैफियतदाराच्या खोट्या सह्या करून फसवणुक केली आहे.अश्या परिस्थितीत कैफियतदार हा गरीब अल्प शिक्षीत शेतकरी असुन त्याच्यावर सर्व गैर कैफियतदारांनी संगणमत करून अन्याय केलेला आहे. सबब तात्कालीन शाखा व्यवस्थापक, तात्कालीन तलाठी, व अज्ञात कर्जदार ज्याने स्वत:ला कैफियतदार म्हणुन खंडू बंडू शिंदे असल्याचे सांगून सदर कर्ज मिळविले,या प्रकारणाची चौकशी होवुन संबंधितावर गुन्हे दाखल करुन मला न्याय मिळावा म्हणुन खंडु शिंदे यांनी धामणगाव बढे पो.स्टे व पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे कडे दिली आहे परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही संबधीतावर करण्यात आलेली नाही असे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here