खामगाव दि. २९ : येथे ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाओ महा अधिवेशनात समस्त ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी नेते मोहनभाऊ हिवाळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांसाठी महत्वाची बाब म्हणजे, ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी जनगणना व ओबीसी वर्गाच्या विविध न्याय व हक्क मागण्या केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाओ अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सर्व ओबीसी बांधवानी आपल्या न्याय हक्कासाठी यात सहभागी होऊन चळवळीत आपले योगदान द्यावे असे मोहनभाऊ हिवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.