Home विदर्भ बुलडाणा जिल्हयात विषेश सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणुक करा : राणा दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा जिल्हयात विषेश सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणुक करा : राणा दिलीपकुमार सानंदा

खामगांव:- बुलडाणा जिल्हयात सद्यस्थितीत एक मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय व 24 प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय कार्यरत आहे. तसेच एकुण 11 नियमित सहाय्यक सरकारी अभियोक्ता व 6 विषेश सहाय्यक सरकारी अभियोक्ता कार्यरत आहे. त्यामुळे जिल्हयातील शेगांव,खामगांव,मेहकर,चिखली, जळगांव जामोद,मलकापूर व बुलडाणा या सर्व ठिकाणी एका सरकारी अभियोक्त्यांकडे दोन न्यायालयातील कामकाजाची जबाबदारी आहे. सर्व न्यायालयामधील कामकाजाची वेळ सारखी असल्याने  खटल्यांचे कामकाज मोठया प्रमाणात प्रभावीत होत असुन न्यायालयातील कामकाज हे खोळंबत आहे. न्याय प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे न्याय प्रणाली वेगवान होण्यासाठी बुलडाणा जिल्हयात विषेश सरकारी अभियोक्त्यांची नेमणुक करावी अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी बुलडाणा यांना सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, फौजदारी न्याय व्यवस्था वेगवान होण्याकरीता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे.बुलडाणा जिल्हयातही ही संख्या वाढली आहे. सदर व्यवस्थेमुळे फौजदारी न्यायप्रणाली वेगवान होण्याची शक्यता होती. परंतू सर्व न्यायालयांमध्ये पुर्णवेळ सहाय्यक सरकारी अभियोक्ता नसल्याने व एकाच सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांकडे 2 कोर्टाचा भार असल्याने न्यायालयाची संख्या वाढुनही बुलडाणा जिल्हयात न्यायाचा वेग वाढण्यास मदत झालेली नाही. त्यामुळे मा.संचालक अभियोग संचालनालय मुंबई यांनी ज्या-ज्या ठिकाणी सहायक सरकारी अभियोक्यांची कमतरता असेल त्या-त्या ठिकाणी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवुन कलम 25/3 फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार विषेश सहायक सरकारी अभियोक्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु करण्याकरीता परिपत्रकात नमुद केले होते. त्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांना सानंदा यांनी अवगत केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या बाबत डिसेंबर 2019 मध्ये जाहिरात देखील प्रकाषित केली होती. मात्र कोव्हिड कालावधीत सदरची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. आता नियमित न्यायालयीन कार्यवाही सुरु झालेली आहे. त्यामुळे सदर तहकुब करण्यात आलेली प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन न्यायप्रणाली वेगवान होण्यासाठी बुलडाणा जिल्हयात विषेश सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणुक करण्यात यावी अषी मागणी सानंदा यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असुन या या निवेदनाच्या प्रति राज्याचे गृहमंत्री ना.अनिलजी देषमुख,बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठांना पाठविल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here