Home Breaking News किती बदमाशी, असा आहे कृउबासमधील प्रशासक काळातील गैरकारभार!

किती बदमाशी, असा आहे कृउबासमधील प्रशासक काळातील गैरकारभार!

नंदलाल  भट्टड यांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण
खामगाव (प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक कार्यकाळात सुरू असलेल्या अंधाधुंद कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदु भट्टड यांनी आज 28 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्या कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.
या संदर्भात नंदु भट्टड यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून कार्यवाही न झाल्यास एक दिवशीय लाक्षणिक करण्याचा ईशारा दिला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी लेखा परिक्षक वर्ग-2 दिपक जाधव यांना 19 जानेवारी रोजी पत्र देऊन 7 दिवसाचे आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. माझ्या समक्ष झालेल्या चौकशी दरम्यान सचिव भिसे व तत्कालीन प्रशासक ओमप्रकाश साळुंके यांनी अनेक गैरकारभार केल्याचे स्पष्ट निर्दशनास आले. ज्यामध्ये ज्यांना बाजार समितीकडून भाडेपट्टयावर गाळे मिळाले आहेत. त्यांनी सदर गाळे विविध बँकांकडे गहाण ठेऊन बँकेकडून कर्ज उचलल्याबाबतची नोंद बाजार समितीच्या नमुना ड वर झालेली आहे. यासाठी बाजार समितीने संबंधितांना मुळ दस्तावेज दिले काय? व अश्या प्रकारे बाजार समितीची मालमत्ता गहाण ठेवता येते काय? भाडेपट्टयाचे मुळ दस्तावेज कोणाकडे आहे? व संबंधितांनी बाजार समितीला किती डिपॉझिट दिले? आणि त्यांनी बँकेकडून किती कर्ज घेतले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी दरम्यान प्रोसिडींगची पहाणी केली असता त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्याने सदर प्रोसिडींगची प्रत देण्याबाबत 23 जानेवारी रोजी मागणी केली असता, आजपर्यंत प्रत देण्यात आली नाही. कारण या प्रोसिडींगमध्ये सचिव हे स्वतःच्या सोयीनुसार बाजार समितीचा कारभार करित असून यामध्ये अनेक गैरकारभार झाल्याचे प्रोसिडींग बुक पाहिल्यास दिसून येते. त्यामुळेच सचिव प्रोसिडींग बुक देण्यास टाळाटाळ करित आहे. प्रोसीडींग बुकमध्ये दि.27 नोव्हेंबर 2020 नंतर कोणतीही सभा झालेली नाही व 110 पाने कोरी असतांना नविन प्रोसीडींग बुक तयार करून दि.2 जानेवारी 2021 ची प्रशासक कृपलानी यांनी सभा घेतली आहे. मग डिसेंबर 2020 च्या खर्चाला मंजुरात आहे किंवा नाही? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. या सर्व गैरकारभार प्रकरणी चौकशी करून तत्कालीन प्रशासक ओमप्रकाश साळुंके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खामगाव व सचिव मुकुटराव भिसे यांच्या विरोधात कार्यवाही प्रस्तावित करावी याबाबत आज नंदु भट्टड यांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here