Home Breaking News अश्लील शिवीगाळ करणा-या आ.गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करा- आ.ॲड.आकाश फुंडकर

अश्लील शिवीगाळ करणा-या आ.गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करा- आ.ॲड.आकाश फुंडकर

बुलढाणा जिल्ह्यातही हा लोकशाही उत्सव पार पडला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या लागलेल्या निकालानंतर भाजपा राज्य कार्यकारीणी सदस्य तथा मा.आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाजपा कार्यकर्ते ,समर्थक ,ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे वक्तव्य वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये केले. परंतु बुलढाण्याचे आ.गायकवाड ह्यांना निकालातील काहीशी परिस्थिती आपल्या विरोधात असल्याची जाणीव होताच त्यांनी हा राग व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांचे विरुद्ध ई.टी.व्ही.भारत व सिटी न्युज ई वृत्तपहिन्यांना मुलाखत देतांना जाहीरपणे अत्यंत उद्धटपणे खालच्या व अश्लील भाषेत वक्तव्य करून आपल्या असंस्कृतपणाचे जाहिरपणे प्रदर्शन करून मा.आमदार विजयराज शिंदे यांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्यावतीने भाजपा पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्र दिले
वास्तविकता हे निकाल कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांचे नसून ते गाव पातळीवरील ग्रामपंचायतीचे आहेत. ह्या विधानाचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नसतांना निव्वळ मनातील राग व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी मानसिक संतुलन घसरल्यागत बडबड करून त्यांची राजकारणातील असभ्यता लोकांच्या समोर आणली.
भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी जिल्ह्याचे ठिकाण असणाऱ्या बुलडाणा विधानसभेचे एक नाही दोन नाहीतर तीनदा मतदारांची मने जिंकून प्रतिनिधित्व केलेले आहे. जनतेने त्यांना भरभरून मतांचे दान देऊन विजयी केले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामूळे मा.विजयराज शिंदे यांचाच अपमान झाला नसून ज्या जनतेनी मतदारांनी त्यांना तिनदा निवडून दिले अश्या मतदार जनतेचा सुद्धा हा अपमान झालेला आहे.
मा.विजयराज शिंदे हे आमदार असतांना बुलढाणा विधानसभेत विकासाची अनेक कामे करीत इतिहास रचलेला आहे. निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव असून जय पराजय हा त्याचा एक भाग आहे. विजयराज शिंदे यांनी अनेक जय पराजय पचवून राजकारण, समाजकारणात सर्वच लहान मोठ्या,दिन दुबळ्या घटकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व केले आहे ते आजही जनतेच्या सेवेत अविरत आहे.
आ.संजय गायकवाड यांनी मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या विरुद्ध अश्लील विधान करुन असभ्यपणाचा कळस गाठला आहे. आमदार गायकवाड हे या सभागृहाचे सदस्य़ असून त्यांनी अश्या प्रकारे वैयक्तीकरीत्या अश्लील विधान करणे म्हणजे त्या सभागृहाची पावित्र्यता भंग करण्यासारखे आहे. आपण आता गल्ली बोळातील कार्यकर्ता नसून जनतेने निवडून दिलेले आमदार आहोत या वास्तवतेची जाणीव त्यांना अजून देखील झालेली नाही,असे दिसून येते.
एका विधानसभा सदस्यांने अश्या प्रकारे असंवैधानिक भाषा वापरून अख्या सुसंस्कृत बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे नाव खराब केले आहे. आमदार हा त्या मतदार संघातील तीन ते चार लाख लोकांचा आरसा त्यांचे प्रतिबिंब असतो. परंतु यातील काहीच ज्ञान व त्यानुरूप सुसंस्कृतपणा त्यांच्यात आला नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे व ही मोठी शोकांतिका आहे. आज पर्यंत बुलडाणा विधानसभा मतदारसंघात अनेक निवडणुका व जय पराजय झाले परंतु आजपर्यंत कोणीही सदस्याने अश्या प्रकारचे सत्तेच्या नशेत जाऊन अश्लील शिवीगाळ करून बेताल वक्तव्य केल्याचे दिसून आले नाहीत. आ.गायकवाड यांच्या या वक्तव्याने आज “सुसंस्कृत बुलडाणा विधानसभा मतदार संघाचा हा विकृत चेहरा” जनतेपुढे आला आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याच्या वतीने सत्तेत मदमस्त झालेल्या आ.संजय गायकवाड यांच्या अश्लील व बेताल वक्तव्याचा “जाहीर निषेध” करतो.
तसेच आ.संजय गायकवाड ह्यांनी भाजपा प्रदेश प्रतिनिधी तथा मा.आमदार विजयराज शिंदे यांना उद्देशून केलेल्या अश्लील शिवीगाळ प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा भाजपा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रा.श्री दिपक वारे प्रदेश सचीव किसान मोर्चा, सौ.सिंधुताई खेडेकर जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा, विठठलराव येवले माजी नगराध्यक्ष, श्री पुरुषोत्त़म लखोटीया जिल्हाउपाध्यक्ष भाजपा यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थ‍ित होते, अशी जितेंद्र कुयरे याांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here