Home Breaking News १ फेब्रुवारी पासून बेशिस्त वाहनचालक,अतिक्रमणधारक रडारवर; वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा...

१ फेब्रुवारी पासून बेशिस्त वाहनचालक,अतिक्रमणधारक रडारवर; वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा असा आहे ‘ऍक्शन प्लॅन’

शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांचा असा आहे ‘ऍक्शन प्लॅन’

खामगाव : शहारत चांगले रस्ते बांधले आहेत, मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही. ,फेरीवाले, दुकानदार, अतिक्रमणधारक यांनी रस्ते व्यापाले असल्याने वाहतूकला अडथळा येत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करणे गरजेचे असून त्याबाबत आम्ही योजना आखली आहे. त्यानुसार अतिक्रमण हटाव,वफॅन्सी नंबर, अवैध प्रवासी वाहतुक, वाहन जप्ती, दंडात्मक व फोजदारी करावी, अवैध पार्किंग तसेच नियम न पाळणाऱ्यावर कारवाई केली जाणार अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . १ फेब्रुवारी पासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात बाहेर गावातील लोक परत आले, त्यांनी रोजगार सुरू केले. त्यामुळे अतिक्रमण वाढून रस्ते वाढले तरी वाहतुकीची व्यवस्था कोलमडली. कोरोना काळात आम्ही मानवतेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मात्र आता वाहतूक सुरळीत करण्याची गरज असून आम्ही तशी पाहणी करून ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. नगर पालिका, माध्यम व नागरिकांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे, असेही हेमराज राजपूत म्हणाले या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार सुनील अंबुलकर, सुनील हूड यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेतील मुद्दे

खामगांव शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी व रहदारीस येणारा
अडथळा दुर करण्यासाठी उद्यापासुन पी.स्टे. खामगांव शहर मध्ये वाहतुक मोहीम
राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संपुर्ण व्यापारी बंधू आणी वाहतुकदार नागरीक
यांनी खालील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दुकानदार यांनी आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला लावलेला
पेवर ब्लॉकवर आणून ठेवून प्रदर्शन करू नये. तसेच दुकानाचे बोर्ड, फ्लेक्स, पुतळे,
खुर्ची, टेबल, बेंच इत्यादी सुध्दा रोडवर किंवा पेवर ब्लॉकवर मांडू नये.

लोटगाड्यावरून विक्री करणारे फ्रुट, भाजीपाला, सिझनेबल वस्तु इत्यादी
मार्केटमध्ये मुख्य रस्त्यावर गाडी लावून विक्री न करता इतर भागात गाडी फिरवून
विक्री करावी.

नागरिकांनी वेगवेगळ्या कामाकरीता शहरामध्ये आल्यानंतर शिस्तबध्दरित्या आपली
गाडी दुसर्या वाहनांला, पायी चालणाऱ्याला व वाहतुकीला अडथळा होणार नाही या
पध्दतीने लावावी. विशेषतः ज्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे
आखलेले आहेत अश्या ठिकाणी पट्टयाच्या आतमध्ये गाडी पार्कीग करायी. तसेच
संबधीत दुकानदारांनी सुध्दा आपल्या ग्राहकाची गाडी अस्ताव्यस्त लागणार नाही
याची दक्षता घ्यावी.

ज्या ठिकाणी दुकान आणी गोडावून आहेत अश्या ठिकाणी मोठ्या वाहनांमधुन माल
आल्यानंतर त्या गाडीमूळे मोठ्या प्रमाणात वाहतुक बाधीत होवून वाहतूक कोंडी
निर्माण होते. तरी सर्व व्यापारी बंधूना विंनती आहे की, त्यांनी त्यांच्या दूकानात
येणारा माल रात्री 10/00 वा ते सकाळी 08/00 या दरम्यानच उतरवून घ्यावा. तसेच
त्यांच्या दूकानात येणारे किरकोळ व्यापारी यांच्या गाड्या वाहतुकीस अडथळा होणाज
नाही या पध्दतीने लावण्यास सांगूनच माल द्यावा.

> प्रवासी वाहतुक करणारे वाहने काळी पिवळी अॅटोरिक्षा, अॅपे, जिप इत्यादी यांन
ठरवून दिलेल्या थांब्यावरच थांबून आपले प्रवासी घ्यावे आणी त्याच ठिकाणी उतराव
इतर ठिकाणी वाहने लावू नये.
वरील बाबींचे उल्लंघन केल्यास भा.दं.वि. कलम 283 व इतर प्रचलित नियमांप्रमा
गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी सर्व व्यापारी बंधू आणी नागरिकांनी पोलीस प्रशासनास वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.

अशी आहे विशेष मोहीम

दिनांक 01.02/2021 पासुन संपूर्ण खामगांव शहरामध्ये विशेष मोहीम राबविण्यात
येत असुन सर्व नागरिकना सुचित करण्यात येते की, आपल्या वाहनाची मालकी
हक्काचे कागदपत्र व ड्रायवक्हंग लायसन्स सोबत बाळगावे किंवा त्यांची
मोबाईलमध्ये स्वोफ्ट कॉपी ठेवावी
* वाहनांवर टु किलर, थ्री विलर, फोर क्िलर इत्यादी फॅन्सी नंबर, डिझाईन
केलेला नंबर न टाकता आर.टी.ओ. नियमाप्रमाणे प्रमाणीत केलेलाच नंबर
* कौणीही रजिस्ट्रेशन क्रमांक न टाकता कोरी नंबर प्लेट ठेवून किंवा नंबर
प्लेटवर वेगवेगळे चित्र टाकून गाड़ी चालवू नये.
अश्या प्रकाराचे वाहन मिळन आल्यास सदर वाहन पोलीस स्टेशनला डिटेन
करून वाहन चालक । मालक यंचिविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई
करण्यात येईल.
तरी सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे नियमोंचे पालन करून पोलीस प्रशासनास
सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here