Home Breaking News शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांचा असा आहे ‘ऍक्शन प्लॅन’

शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांचा असा आहे ‘ऍक्शन प्लॅन’

खामगाव : शहारत रस्ते बांधले आहेत, मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत  नाही. रस्ते फेरीवाले दुकानदार यांनी रस्ते व्यापाले असल्याने वाहतूकला अडथळा येत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करणे गरजेचे असून त्याबाबत आम्ही योजना आखली आहे. फॅन्सी नंबर अवैध प्रवासी वाहतुक, वाहन जप्ती,  दंडात्मक व फोजदारी करावीअतिक्रमण हटाव, अवैध पार्किंग तसेच नियम न पाळणाऱ्यावर  कारवाई केली जाणार अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .

कोरोनाकाळात बाहेर गावातील लोक परत आले, त्यांनी रोजगार सुरू केले. त्यामुळे रस्ते  वाढले तरी वाहतुकीची व्यवस्था कोलमडली. कोरोना काळात आम्ही मानवतेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मात्र आता वाहतूक सुरळीत करण्याची गरज असून आम्ही तशी पाहणी करून ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. नगर पालिका, माध्यम व नागरिकांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे, असेही हेमराज राजपूत म्हणाले या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार सुनील अंबुलकर, सुनील हूड यांची उपस्थिती होती.

काय आहे प्लॅन…. वाचा लवकरच
www.therepublic.co.in वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here