शेगावातील सुरभी कॉलनीत आगळा वेगळा उपक्रम…
शेगाव: मकरसंक्रांत निमित्ताने काही दिवस ज्याप्रमाणे महिलांचे सर्वत्र हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात.यामधून त्यांचा आपसात सुसवांद, चर्चा,व मनोमिलन होते. आजच्या धावपळीच्या युगात पुरुष सुद्धा आपापल्या कामात नेहमी मग्न असतात. वेळेअभावी त्यांचा शेजारी किंवा परिसरातील व्यक्तीशी साधा वार्तालाप पण होत नाही.त्यामुळे महिलांच्या हळदी कुंकवाचे धर्तीवर स्थानिक सुरभी कॉलनी मध्ये श्यामभाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून आगळा वेगळा असा पुरुषांचा अष्टगंध सोहळा पार पडला.सदर कार्यक्रम सुरभी कॉलनी मधील मारोती मंदिरचे प्रांगणात 24 जानेवारी रोजी संध्याकाळी परिसरातील रहिवाशी पुरुषांच्या उपस्थितीत घेण्यात आला.याप्रसंगी सदर कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षक रवींद्र माळी व श्यामभाऊ जाधव यांनी विषद केला यात महिलाप्रमाणे पुरुषांमध्येही आपसात सुसंवाद व चर्चा घडून यावी यातून परिसरातील समस्या व विकासात्मक बाबीवर विचारविनिमय करण्यात यावी,आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे महिलांनी सुद्धा वाण वाटताना वस्तूएवजी वृक्ष रोप भेट द्यावे,आपसी मतभेद,मनभेद विसरून सर्वांनी चर्चेतून मार्ग काढावे असे त्यांनी सांगितले.तदनंतर सर्वांना अष्टगंध लावून तीळ गूळ वितरित करण्यात आला.कार्यक्रमात डॉ जाधव ,साहित्यिक कवी विश्वासराव देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आयोजक श्यामभाऊ जाधव यांचे कौतुक केले.यावेळी सुरभी कॉलनी अध्यक्ष वसंतराव शेळके,श्री कोकाटे,गुप्ताजी,डॉ चिकटे,गजानन ठाकरे, एकनाथ पाटील,घनश्याम माळी,पत्रकार राजेश चौधरी,अमित पाटील,अमोल अहिर, नेमाडेबुवा,पोंदेभाऊ, राहुल कोकाटे,रवी टिकार,सुबोध जाधव,मुन्ना पोहरे,यांचेसह सुरभी कॉलनी व दुर्गा नगरातील इतर पुरुष मंडळी उपस्थित होती.