Home Breaking News सर्वात जास्‍त उच्च शिक्षित विजयी महिला उमेदवार सौ.मिनल स्‍वप्‍निल ठाकरे

सर्वात जास्‍त उच्च शिक्षित विजयी महिला उमेदवार सौ.मिनल स्‍वप्‍निल ठाकरे

आपल्‍या शिक्षणाचा उपयोग गाव हितासाठी करणार असल्‍याचा व्‍यक्‍त केला मानस

मुलाखत – संभाजीराव टाले

खामगाव  : खामगाव : ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून अनेक यामध्ये अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्‍या उमेदवारांमध्ये प्रत्‍येक उमेदवाराची आपअापली एक आगळी वेगळी ओळख असून कोणी शिक्षित तर कोणी अशिक्षित तर कोणी शेतकरी, कोणी शेतमजुर, कोणी दुकानदार तर कोणी व्‍यापारी छोटे, मोठे गावातील व्‍यावसायिक तर कोणी बेरोजगार असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. पण या सर्वांमध्ये खामगाव शहरालगत असलेली सुटाळा खुर्द ग्रामपंचायतमध्ये स्‍वप्‍निलदादा ठाकरे यांच्‍या पत्‍नी सौ.मिनल स्‍वप्‍निल ठाकरे या विजयी उमेदवार सर्वात जास्‍त शिक्षित असलेल्‍या महिला उमेदवार आहेत.
तालुक्‍यातच नव्‍हे तर जिल्‍ह्यात या एकमेव उमेदवार आहेत. त्‍यांनी एमई कॉम्‍प्‍युटर सायन्‍स या विषयात पदवीधर असून आपल्‍या शिक्षणाचा उपयोग गावहितासाठी करण्याकरीता राजकारणात त्‍यांनी टाकलेले पाऊल त्‍यांचा धाडसी निर्णय पाहून साप्‍ताहिक ग्रामक्रांतीचे प्रतिनिधी यांनी थेट त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन त्‍यांचे अभिनंदन करुन त्‍यांची मुलाखत घेतली.
यावेळी सौ.मिनलताई ठाकरे यांनी सांगितले की,  माझे वडील विवेकराव देशमुख हे डॉक्‍टर असून ते अमरावती येथे सर्वसामान्‍य जनतेची सातत्‍याने रुग्‍णसेवा ही ईश्वर सेवा म्‍हणून करतात. तर आई सौ. संध्या देशमुख या मेडीकल ऑफिसर म्‍हणून सामान्‍य रुग्‍णालयात सेवा देत आहेत. त्‍याचप्रमाणे माझा विवाह होवून मी ज्‍या ठाकरे कुटूंबियांची सुन झाली आहे.
त्‍या ठाकरे परिवाराचे सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात खुप मोठे कार्य असून त्‍यांचे माेठे योगदान आहे. माझे सासरे म्‍हणजे बाबा स्‍व.संजयजी ठाकरे हे जिल्‍हा परिषद सदस्‍य होते त्‍याच प्रमाणे माझ्या सासु म्‍हणजेच आई सिमाताई ठाकरे या सुध्दा जिल्‍हा परिषद सदस्‍य राहिलेल्‍या आहेत.त्‍यामुळे निश्चितच राजकीय वसा हा ठाकरे कुटूंबियांना आहेच. आणि मला सुध्दा सामाजिक कार्य करण्याची आवड ही सुरुवातीपासून होतीच. माझ्या आवडीचे विषय म्‍हणजे थोर महापुरुषांच्‍या आत्‍मचरित्राचे वाचन करणे, त्‍याचप्रमाणे स्‍त्री ही जगत जननी असून स्‍त्री ही कमजोर नसून शक्‍तीशाली आहे.
माँ जिजाऊसाहेब, क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले तसेच राणी लक्ष्मीबाई यांच्‍याकडून मुलींना, स्‍त्रियांना सातत्‍याने प्रेरणाच मिळते आणि मलाही सुध्दा यांच्‍या आत्‍मचरित्राच्‍या वाचनातून प्रेरणाच मिळाली आहे. लिहीणे वाचणे, गायन, प्रोग्राम होस्‍टींग या माझ्या आवडी  आहेत. मला सुरुवातीपासून सासू सासरे व पती याचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन मिळाले. ग्रामपंचायतच्‍या निवडणुका सुरु झाल्‍या होत्‍या आणि अचानक वेळेवर ही निवडणूक लढावी असा निर्णय अगदी क्षणावर घेण्यात आला आणि निवडणुकीला सामोरे  जावे लागले. एक विचार मनात आला होता,  कि निवडणूकीच्‍या भानगडीत न पडता. आपल्‍या शिक्षिणाच्‍या माध्यमातून काही तरी वेगळे काही करावे, पण दुसरीकडे हाही विचार आला, कि जर करायचेच असेल तर आपल्‍या शिक्षणाचा आपल्‍या विचारांचा व  कार्यक्षमतेचा उपयोग जर निवडणूक लढवून जर गावहितासाठी केला.
तर ते अधिक योग्‍य ठरेल व मनाच्‍या समाधानीचेच ठरेल. म्‍हणून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्णय करुन निवडणूक लढवली.जनतेने सुध्दा मला भरभरुन मतदान रुपी आशिर्वाद दिले. त्‍यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याठी येत्‍या काळात प्रयत्‍न करेल व त्‍यांच्‍या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्‍याचप्रमाणे निवडणूक होण्यापर्यंतच फक्‍त राजकारण असते निवडुन आल्‍यानंतर कोणत्‍याही पक्ष नसतो सर्वच आपले असतात आणि सर्वांच्‍या हितासाठीच कार्य करणे हेच आपले कर्तव्‍य आहे असे माझे स्‍पष्ट मत आहे.  व मी माझ्या परिने होईल तितके चांगल्‍यात चांगले करण्याचा पुरेपुर प्रयत्‍न करेल.
मला ज्‍यांनी मतदानरुपी तसेच ज्‍यांनी प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्ष सहकार्य केले त्‍यांचे तसेच माझ्या संपुर्ण वार्डातील जनतेेचे मी मनपुर्वक आभार मानते. अशी प्रतिक्रिया त्‍यांनी या मुलाखतीच्‍य वेळी दिली. खरचं सौ. मिनल स्‍वप्‍नील ठाकरे यांचे उच्च शिक्षण असून त्‍यांचे उच्च विचार आहेत. त्‍यांच्‍या प्रभावशाली विचारांना येकून आम्‍हाला निश्चित म्‍हणावेसे वाटते त्‍यांच्‍या माध्यमातून सुटाळा खुर्द गावाचा विकास होणार ऐवढे मात्र खरे.त्‍यांना पुढील कार्यास साप्‍ताहिक ग्रामक्रांतीच्‍या वतीने शुभेच्‍छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here