Home Breaking News महिला व बालविकास मंत्री यशोमती ताईंनी चिमुरड्या कार्तिकीला मिळवून दिला आधार

महिला व बालविकास मंत्री यशोमती ताईंनी चिमुरड्या कार्तिकीला मिळवून दिला आधार

 

बुलढाणा – महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ताई ठाकूर यांच्या सामान्यांसाठी ऑन द स्पॉट निर्णय घेण्याच्या धडाडीचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नुकत्याच पार पाडलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. हा कार्यक्रम आटोपून यशोमती ताई मंचावरून उतरत असताना गोदरी गाव तालुका चिखली येथील चार पाच वर्षांची चिमुरडी कार्तिकी महाले तिच्या आजीसह ताईंना भेटली. अपघातात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या कार्तिकीचा सांभाळ तिची वृद्ध आजी करते. घरात कमावता नसल्याने नातीचा सांभाळ करण्यात आजीची आर्थिक ओढाताण होत होती.
आपली कैफियत आजींनी यशोमती ठाकुर यांना सांगितली. ताईंनी मायेने कार्तिकीला कडेवर उचलून घेतले. राहुल बोंद्रे यांना बोलावून घेऊन या नात आजीला मदत करता की मी सोबत यांना घेऊन जाऊ असे विचारले. माजी आमदार बोंद्रे यांनी तत्काल हिरकणी पतसंस्थेस कार्तिकीस दत्तक घेण्यास सांगितले. तसेच दरमहा 500 रुपयांची मदत देण्याचा देखील निर्णय घेतला.
यशोमती ठाकूर यांच्या ऑन द स्पॉट निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे कार्तिकी आणि तिच्या आजीला आधार मिळाला. रडत आपली कहाणी सांगणाऱ्या महाले नात आजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here