Home Breaking News “मी समृद्ध गांव समृद्ध’’ योजनेसह इतर योजनेतून ग्राम विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी...

“मी समृद्ध गांव समृद्ध’’ योजनेसह इतर योजनेतून ग्राम विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी : ना. यशोमती ठाकूर

खामगांव :ग्रा. पं. निवडणूक ही अत्यंत जिकरीची व कठीण निवडणुक मानली जाते. या निवडणुकीमध्ये मतदार संघाचे नेतृत्व करणाछया राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला विश्वासात घेऊन निवडणुक लढविली व मतदार संघातील ९० टक्के ग्राम पंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षाचा झेंडा फडकविला आहे ही बाब अभिमानास्पद असुन नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातुन आपले गांव आदर्श गांव बनवावे, महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘‘मी समृद्ध गांव समृद्ध’’ योजनेसह इतर योजनेतून ग्राम विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जाईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्क मंत्री ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर यांनी केले.
२३ जानेवारी २०२१ रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेगांव रोडवरील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर येथे नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे व सत्कार मुर्ती मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेशभाऊ एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, जि. प. अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई पडघाण, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, महाराष्ट्र मागासवर्गीय सेलचे प्रदेश अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे, महिला प्रदेश सरचिटणीस डॉ. तबस्सुम हुसैन, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे, एन.एस.यु.आय. चे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख सुरेश वावगे, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा, धनंजय देशमुख, न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोश देषमुख, राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांची प्रमुख उपस्थिती होती.

सानंदा निकेतनवर भेट

याप्रसंगी सानंदा परिवाराच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महाराश्ट्राचे दैवत छत्रपती षिवाजी महाराज यांची मुर्ती भेट देउन ना.यषोमतीताई ठाकूर यांचा सत्कार केला.माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी त्यांचे कुकुंम तिलक लावुन औक्षण केले व त्यांना साडी भेट दिली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा, सौ.सवितादेवी सानंदा, उद्योजक राणा राजेंद्रसिंह सानंदा,राणा सागरकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते. तद्नंतर ना.यषोमतीताई ठाकुर यांनी सानंदा परिवारा सोबत स्नेहभोजन घेतले. यावेळी बुलडाणा जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे,प्रदेष सरचिटणीस ष्यामभाउ उमाळकर, काॅंग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील,अनिरुध्द पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here