Home मलकापूर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम वाघुड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणा ला कंटाळून राहत्या घराच्या बाथरुम समोरील छताच्या बांबुला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
          याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाघुड येथील अल्पभुधारक शेतकरी शंकर रामभाऊ महाले वय साठ यांच्या कडे दोन एकर शेती असून शेतात सतत होणाऱ्या नापीकी व बॅंकांचे कर्ज, परीवाराचे पालनपोषण करतांना होणाऱ्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शंकर महाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची फिर्याद वाघुड चे माजी सरपंच उध्दव ठाकरे, पोलीस पाटील गजानन तायडे यांनी शहर पो.स्टे ला दिली, घटनास्थळी ऐ.पी.आय स्मिता म्हसाये,पो.काॅ.मंगेश चरखे,पो.काॅ.प्रमोद राठोड आदींनी पोहचुन प्रेत शवविच्छेदना साठी मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,मृतक शंकर महाले यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा आप्त परिवार आहे.
       आत्महत्येप्रकरणी शहर पोलीसांनी मर्ग नं 5/21 दाखल केला असून पुढील तपास पो.काॅ.प्रमोद राठोड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here