संग्रामपूर : दिल्ली येथे कृषी कायद्यांचा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात अनेक ठिकाणी येत्या २६ जानेवारी ला ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार आहे.
शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने २६ जानेवारीला शेतकऱ्याचं पारंपारिक वाहन बैलगाडी चा मार्च काढून माननीय तहसीलदार, संग्रामपूर यांना निवेदन द्यायचे आहे.
तरी संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी बैलगाडी मार्च मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
शेतकऱ्यांसाठी अशा सूचना
बैलगाडी मार्चमध्ये येतांना आपण शेतकरी म्हणूनच सहभागी व्हावे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही
आपल्या बैलगाडी मार्च मुळे इतर कोणालाही काहीच बाधा निर्माण होणार नाही याची जाणीव असावी
बैलगाडी मार्च मुळे प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये उलट त्यांच्या सोबत सहकार्य वृत्तीनेच वागावे.
शेतकऱ्यांनी बैलगाडी मार्च मध्ये येतांना सोबत आपली न्याहरी/जेवण आणावे निवेदन दिल्यानंतर आपण सर्व सोबत न्याहरीचा लाभ घ्यावा
सर्व शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन सकाळी ०८:०० वाजता संग्रामपूर बसस्टॉपवर एकत्र येऊन तेथून तहसील कार्यालयाकडे अत्यंत शिस्तीत व शांततेत जायचे आहे. मार्च ची वेळ सकाळी ८ वाजता बसस्टॉप संग्रामपूर येथून सुरवात होईल.