Home साहित्य डॉ किशोर वानखेडे यांचा संशोधित ग्रंथ विदर्भातील सुफी संत लवकरच प्रकाशित

डॉ किशोर वानखेडे यांचा संशोधित ग्रंथ विदर्भातील सुफी संत लवकरच प्रकाशित

खामगाव : विदर्भ प्रांत प्राचीन काळापासून धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे.वैदिक संस्कृती बरोबरच बोध्द,जैन,मुस्लिम संस्कृतीचा ही प्रभाव विदर्भावर दिसून येतो.विदर्भातील सुफी संतांच्या कार्यावर संशोधन करून डॉ किशोर वानखेडे यांनी तेराव्या शतकापासून चां सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक इतिहास या ग्रंथात मांडला आहे.हा ग्रंथ विदर्भातील सुफी संत या नावाने प्रकाशित झाला आहे.
प्रस्तुत ग्रंथामध्ये विदर्भातील सुफी संतांचे कार्य,छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळापूर येथील सुफी संतांचे संबंध,मोघल बादशाह औरंगजेब आणि बाळापूर चां संबंध,हैदराबाद चे निजाम,अचलपूर चे नवाब,नागपूर चे भोसले राजे यांचे सुफी संताशी असलेले श्रद्धेचे आणि सलोख्याचे संबंध,विदर्भातील वैदिक,हिंदू संत,जैन मुनी आणि सुफी संतांच्या कार्याचा समाज मनावरील परिणाम,तसेच विदर्भातील सामाजिक ,सांस्कृतिक देवाण घेवाण मध्ये सुफी संतांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा प्रस्तुत ग्रंथामध्ये लेखकाने उत्तम रित्या संशोधन करून मांडला आहे.
विदर्भातील सुफी संतांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ मराठीतून पहिलाच ग्रंथ असल्याने या ग्रंथाचे संशोधकांना,वाचकांना,अभ्यासकांना अत्यंत महत्त्व आहे.या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा लवकरच खामगाव मध्ये होईल ,तत्पूर्वी हा ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहे असे बाळापूर येथील सुफी संतांचे वंशज,आणि खान काह ग्रंथालयाचे प्रमुख तलहा नक्ष बंदी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here