अजब लग्नाची गजब गोष्ट
चेन्नई | कोरोना संसर्ग रोगामुळं लोकांच्या जीवनशैली मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी आता नवविवाहित जोडं लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. असाच एक अनोखा मार्ग तामिळनाडुच्या मदुरईमधील कुटुंबाने काढला आहे.
कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेल्या नातेवाईकांसाठी देखील वधू-वराला आहेर पाठवता यावेत यासाठी ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा आधार घेत, लग्नपत्रिकेवर चक्क गुगल-पे आणि फोन-पे क्युआर कोड छापण्यात आला.
तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कृपया लग्नाला येताना कपड्यांचे किंवा भांड्यांचे अहेर आणू नका, असा मजकूर लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला लिहिलेला दिसतो.
दरम्यान, शिवशंकरी आणि सरवनन यांचा लग्नसोहळा रविवारी 17 जानेवारीला पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या या अनोख्या लग्नपत्रिकेमुळं ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.