Home वुमन स्पेशल महिलेचा असाही प्रामाणिकपणा

महिलेचा असाही प्रामाणिकपणा

बस मध्ये सापडलेले पॉकेट केले परत
पिंपळगाव राजा(वार्ताहर)-:पिंपळगाव राजा येथील पत्रकार अनिल गिऱ्हे हे राज्य परिवहन च्या बसने प्रवास करीत असतांना त्यांचे पॉकेट बस मध्ये हरवले.त्यांनी इतरत्र भरपूर शोध घेतला मात्र पॉकेट आढळून आले नाही.मेहकर येथील सौ.कलावती रामचंद्र पाटील यांना ते पॉकेट सापडले.त्यांनी तत्काळ मेहकर येथील पत्रकार उध्दवजी फंगाळ यांच्याकडे सुपूर्द केले व ज्यांचे आहे त्यांच्याकडे पोचविण्यासाठी संपर्क केला.त्यांच्या पॉकेटात अनेक महत्वपूर्ण आयडी व कागदपत्रे तसेच रोख रक्कम होती.आज सकाळी त्यांनी सदर पॉकेट अनिल गिऱ्हे यांना सुपूर्द केले.त्यांच्या प्रामाणिक पनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यावेळी पत्रकार उद्धव फंगाळ,सौ.कालिंदा फंगाळ,ज्योती गवई उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here