Home कृषि वार्ता सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करीत असून आपला शेतमाल सेंद्रिय म्हणून विकण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती चे प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विकास संस्थेमार्फत मार्फत करण्यात आले आहे.
उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेतमाल (Organic Product) ची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीच्या पर्यावरणीय, आरोग्यविषयक अशा अनेक फायद्यासह सेंदीय उत्पादनांना थोडी अधिक किमत मिळत आहे. याच कारणांमुळे शेतकरी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहे.
सेंद्रिय शेतीच्या बाजारपेठेचा आपण जर विचार केला तर ‘सेंद्रिय प्रमाणीकरण’ (Organic certification) हा त्यातील महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण मिळत नाही तोपर्यंत सदर शेतमालास बाजारपेठेत सेंद्रिय Organic म्हणून ग्राह्य धरता येत नाही. म्हणूनच शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती होणे गरजेचे असून शेत जमिनीचे सेंद्रिय पद्धतीने प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.
कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती मार्गदर्शन आणि सेंद्रिय प्रमाणीकरण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोबतच सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाला खरेदी विक्री करिता मदत सुद्धा करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्री विनोद निमकाळे यांचेशी ९९७०३०२४१० या क्रमांकावर किंवा संस्थेच्या संताजी नगर मलकापूर येथील कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here