Home Breaking News घोडेबाजार होणार काय? ‘ या’ ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य विजयी होताच रात्रीच...

घोडेबाजार होणार काय? ‘ या’ ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य विजयी होताच रात्रीच सहलीवर!

काँग्रेसचे दोन गट: कोण होणार सरपंच

खामगाव : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुटाळा बु ग्रामपंचायतचे १७ सदस्य रात्रीच सहलीवर गेले असून या सहलीची जोरदार चर्चा खामगाव शहरात रंगत आहे.

खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. शहरातील औद्योगिक वसाहत तसेच सुटाळा बु. गाव असे मिळून ग्रामपंचायतचे १७ सदस्य आहेत. ग्रामविकास आघाडीने येथे सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ओबीसीसाठी येथील सरपंच पद राखीव आहे. येथील रामेश्वर दुतोंडे यांच्यासह जवळपास ९ सदस्य तर विनोद भोपळे यांच्यासह ८ सदस्य सहलीवर गेले असल्याने कोण व कोणत्या गटाचा सरपंच होईल असा अंदाज आहे. विजयाचा गुलाल पडताच हे सदस्य सहलीवर गेले आहेत. विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत काँगेसच्याच ताब्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here