खामगाव: तालुक्यातील ७२ पैकी पळशी खु, काळेगाव , पिंप्री कोरडे ग्रामपंचायत अविरोध असून उर्वरित ६९ ग्रामपंचायतचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस भाजपात चढाओढ सुरू असून यावेळेस काँग्रेस सरशी राहील असे आहे.
जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीच्या 3891 सदस्य निवडीसाठी जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालय त मतमोजणीला सुरुवात झाली आहे प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी केल्यानंतर EVM मशीन मध्ये झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात येत आहे जिल्ह्यात एकुण १५६ टेबलावरून मतमोजणीच्या एकुण १८९ फेऱ्यात होणार असुन . मतमोजणीसाठी ७७७ कर्मचारी आणि इतर ४४९ राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे निवडणूक निकाला नंतर विजयी उमेदवार व ग्रामस्थ जल्लोष करीत आहेत. दरम्यान खामगाव तालुक्यातील मोठया ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस सरशी ठरत असून अजून बरेच निकाल हात यायचे आहेत. त्यामुळे समसमान चित्र राहील असाही अंदाज आहे. भारीपनेही चांगल्या जागा घेतल्या आहेत