डॉ. निलेश टापरे यांनी घेतली पहिली लस
खामगाव: कोविड लसीकरण मोहिमेत बाजी मारत बुलडाणा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिला क्रमांक हिंगोली जिल्ह्याचा लाभला आहे.
संपूर्ण देशात आज जगातील सर्वात मोठ्या कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही 6 लसीकरण केंद्रावर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते लसीकरण मोहिमेस फीत कापून सुरवात करण्यात आली. सर्वप्रथम सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांनी लस टोचून घेतली. त्यानंतर इतर कोरोना योद्धांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात आज ५७६ कोरोना योद्धना कोरोना महारोगावर प्रभावी कोविशील्ड लस देण्यात आली. इतर कोरोना योद्धना 18 जानेवारी ग्राम पंचायत निवडणूक मतमोजणी नंतर लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर दुसरी लस 28 दिवसानंतर देण्यात येणार असून याबाबत माहिती त्यांच्या मोबाईल वर संदेशद्वारे मिळणार आले. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ एस बी वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे, , डॉ राहुल खंडारे, डॉ गुलाब पवार, डॉ राजाभाऊ क्षिरसागर, डॉ सुरेखा खर्चे, डॉ विलास चरखे, डॉ संजीत संत, डॉ ज्ञानेश्वर वायाळ, डॉ सुरेखा खडचे,डॉ दिनकर खिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे, श्रीमती सुमित्राताई राऊत, विठ्ठल पवार, गणेश देशमुख, रमेश अवचार, मुख्य औषध अधिकारी श्रीधर जाधव, शिवदास वाघमोडे, लसीकरण विभागाचे हर्षल गायकवाड, सुमन म्हात्रे, श्रीमती श्रद्धा मोहनकार, शुभांगी तायडे, श्रीमती मुक्ता ढोके, पूजा सिस्टर, श्री जैन, व कोरोना योध्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात बुलढाणा , खामगाव, शेगाव, मलकापूर, चिखली व देऊळगाव राजा या सहा ठिकाणी आजपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात कोरोना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर योद्धना योद्धना मोफत कोविड 19 महारोगावरील प्रभावी लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 19 हजार कोविशील्ड लस उपलब्ध झाली आहे.
बुलडाणा राज्यात दुसरा
आज बुलडाणा जिल्हा कोविड लसीकरण मोहिमेत दुसरा आला आहे. आज ६०० चे टार्गेट होते. त्यापैकीच ५७५ जणांनी लसीकरण केले. लसीकरण बाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्ह्यातील पहिली लस खामगाव येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांनी घेतली. त्यानंतर खामगाव मध्ये १०० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.बुलडाणा जिल्ह्यात आज ६०० लसीकरण टार्गेट होते, त्यापैकी डोज देण्यात आले. त्याची टक्केवारी ८५.८३ आहे. राज्यात हिंगोली पाहिला, खामगाव दुसरा तर खामगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अशी आहे आकडेवारी
बुलडाणा : ८१
चिखली : ८१
दे. राजा : ११०
खामगाव : १०३
मलकापूर: १००
शेगाव :१०१