Home खामगाव विशेष मकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम

मकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम

खामगाव : पर्यावरणाचा -हास होतांना बघवत नसून सुवासिनी आपला प्रत्येक सन पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करीत असल्याचे चित्र आज दि.१४ जानेवारी २०२१ रोजी गुरूदत्त नगर घाटपूरी,खामगाव येथे अनुभवायला मिळाले. येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी संक्रांत सनाला आपल्या पत्नीच्या सहकार्याने “तिळ गुळ घ्या – चिमणीचे एक घरटे लावा ” हा उपक्रम राबवून जनसामान्यांत जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी महिला मंडळाचे माध्यमातून जनजागृती केली आहे. आपल्या कडे संक्रांत सनाला सुवासिनी वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देवून हळदी कुंकूलावायची पध्दत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भेटवस्तूंची जागा प्लास्टिकने घेतली असून ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन वरील उपक्रम राबविण्यात आला असून पूर्वी कृषि केंद्र नसायची व शेतकरी आपल्या शेतात पेरणी करीता घरगुती बीयाने एकमेकांना देवून सहकार्य करायचे.त्याचाच एक भाग संक्रांत सनाला वाण देण्याची व घेण्याची पध्दत असावी त्याकाळी सुवासिनी आपल्या कडील बियाण्याचे वाण उदा.-मुग,उडीद,मका, गहू,भेंडी,गवार इ.देवून सन्मान करीत असत परंतू आजच्या घडीला सर्वदूर सर्रास प्लास्टिकच्या वसाच्या स्वरूपात वाण वाटण्याची जणू होळ लागली आहे.त्याला आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील सुवासिनी ईको फ्रेण्डली वाण देवून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. यावर्षी वाणाच्या स्वरूपात चिमण्यांची लाकडी घरटे वाटून ईको फ्रेण्डली वाणा सोबतच चिमणी संवर्धनाचा संदेशही या माध्यमातून देण्याचे महान कार्य या सुवासिनींनी केले आहे. या प्रसंगी सुवासिनीनी पर्यावरणाचा संदेश देणारी उखाणे घेवून उपस्थितांची मने आपल्या उपक्रमाकडे वळवण्या साठी प्रयत्न केले. वरील उपक्रमात सौ.मंगला गुरव सौ.मणिषा ठाकूर सौ.शोभा भोपळे सौ.मणिषा भोपळे सौ.सोनिया जोशी सौ.पुजा गोयल कु.वैष्णवी भोपळे कु.राशी बरगे कु.मनवा जोशी यांनी अथक परिश्रम घेतले तर कलाध्यापक संजय गुरव यांनी चिमणी घरटे मोफत उपलब्ध करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here