खामगाव ः शासनाने प्रतिबंध घातलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर छापे मारुन चौघांना ताब्यात घेतल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी येथील मोची गल्ली भागात घडली. पोलीसांनी मांजा विक्रेत्यांकडून सुमारे ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शहरामधील मोची गल्ली,आठवडी बाजार भागात काही व्यवसायिकांकडून छुप्या मार्गाने शासनाने प्रतिबंध घातलेला नायलॉन मांजा पंतग उडविण्यासाठी विक्री होत असल्याची गुप्त माहिती शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांना मिळाली. सदर माहितीवरुन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पीएसआय सराग, नापोकाॅ राजु टेकाळे, राठोड आदींनी सापळा रचून मोची गल्ली भागामध्ये ११ जानेवारी रोजी सायंकाळी छापा मारुन चेतन मुकेश चव्हाण वय २३, जितेंद्र गोयल वय ३५ दोघे रा. आठवडी बाजार, कैलास आसेरी वय ५६, महेश दिनेश पवार वय २३ दोघे रा. मोची गल्ली यांना ताब्यात घेवून त्यांचेजवळून वेगवेगळ्या कंपनीचा नायलॉन मांजा किंमत ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपरोक्त चौघांविरुध्द शहर पोलीसांनी कलम ३३६ भादंवि , सहकलम मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Home Breaking News शहर पोलिसांची अवैध मांजा विक्रेत्यांवर छापे चाैघांवर गुन्हा, ८ हजाराचा मांजा जप्त