Home Breaking News अरेरे.. एका भामट्या पत्रकाराने गिळला प्रवासी निवारा

अरेरे.. एका भामट्या पत्रकाराने गिळला प्रवासी निवारा

 

१५ वर्षांपासून अनधिकृत ताबा : कारवाई होणार
संग्रामपूर : बुलडाणा जिल्‍ह्यातील शेवटचे टोक असलेल्‍या आदिवासी बहुल तालुका म्‍हणून ओळखणाऱ्या संग्रामपूर येथील प्रवासी निवारा तब्‍बल १५ वर्षांपासून येथील पत्रकाराच्‍या ताब्‍यात असून त्‍याने तो गिळाला की, काय? असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत.
संग्रामपूर येथून जवळ असलेल्‍या बोडखा गावातील पत्रकाराने संग्रामपूर येथील प्रवासी निवाऱ्या वरती १/३ भागावरती त्‍याची स्‍वतःची चहाची टपरी सुरू केलेली आहे. यामुळे संग्रामपूर शहरात शाळा, कॉलेज येथे येणाऱ्या मुला-मुलींना मागील १५ वर्षांपासून १/३ जेथे आधी तीकीट घर होते त्या जागेला मुकावे लागले आहे. ऊन, वारा, पाऊस यामध्ये या मुला-मुलींना जेवढा प्रवासी निवारा उरलेला आहे त्‍या प्रवासी निवाऱ्यामध्ये त्‍यांना उभे रहावे लागत आहे. परिणामी मागील १५ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव जामोद आगार कुंभकर्णी झोपेतून केव्‍हा जागे होईल, व या प्रवासी निवार्‍याला मुक्‍त करेल याची चर्चा ग्रामपंचायत निवडणूकीच्‍या चर्चेमध्ये रंगत आहे. पत्रकारितेचा धाक दाखवून अजून किती काळ हा पत्रकार प्रवासी निवार्‍याला त्‍याचे चहाची दुकानदारी चालवेल याची खमंग चर्चा संग्रामपूर शहरात चालू आहे. लोकाना ब्रम्हज्ञान शिकवणारा हा भामटा मात्र चुकीचे कामे करत त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

*संग्रामपुर तालुक्यातील काही प्रवासी निवारे भाडेपट्ट्यावर दिले आहेत. संग्रामपूर येथे अतिक्रमण असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल.
– श्री. सोनोने, डेपो मॅनेजर जळगाव जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here