Home Breaking News पीक अप व दुचाकी अपघातात पती- पत्नी ठार

पीक अप व दुचाकी अपघातात पती- पत्नी ठार

दोन वर्षे वयाची श्रेया बचावली

– नातेवाईकांकडे लग्नाला जात असताना अपघात

खामगाव- तालुक्यातील ढोरपगाव येथील दोघे पती पत्नी आज सकाळी 9 वाजेदरम्यान शेगाव तालुक्यातील जवळा येथी मामाकडे लग्नाला जात असताना घाटपुरी शिवारात त्यांच्या दुचाकीला समोरून बोलेरो पीक अप ने जोरदार धडक दिली.या अपघातात पती पत्नी दोघाचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील ढोरपगाव येथील भाजपचे जेष्ठ नेते शत्रूघन पाटील मुंढे यांचे पुतण्या जगदीश महादेव मुंढे वय 33 वर्ष व सून लक्ष्मी जगदीश मुंढे वय 30 वर्ष हे दोघे आपल्या दुचाकी क्र. MH 28 AY 1554 ने शेगाव तालुक्यातील जवळा येथे लग्नाला जात होते. दरम्यान खामगाव- पिंपळगाव राजा रोड वर घाटपुरी शिवारात वॉटर फिल्टर जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो पीक अप क्र. एमएच 28 AB 3964 ने जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश मुंढे याचा जागीच मृत्यू झाला असून लक्ष्मी मुंढे हीचा रुग्णलयात नेत असतानि मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ वेक्त केल्या जात आहे.

अपघाताची घटना इतकी भयावह होती की कु श्रेया चे वडील जागीच ठार झाले तर आई चा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मात्र कु.श्रेया चे दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून ती वाचली.मात्र मायबापाच्या प्रेमाने अखेर ती पोरकी झाली.त्यामुळे याप्रकरणातील आरोपी चालकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here