Home खामगाव विशेष तरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी!

तरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी!

मॅनेजमेंट कॉलेज मध्ये शेतकरी उत्पादक, ग्राम रोजगार सेवक अभ्यासक्रमास मान्यता

खामगाव : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहयोग व विशेष उपक्रम केंद्राने ग्रामरोजगार सेवक कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम, शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मधुमक्षिकापालन प्रमाणपत्र शिक्षणक्रम, सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र शिक्षणक्रम, सुरक्षा अधिकारी प्रगत प्रमाणपत्र शिक्षणक्रम विकसित केलेले असून सदर शिक्षणक्रमास कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये सुरवात झालेली आहे.

ग्रामीण भागातील तरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हा उद्दात हेतु ठेवून कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव येथे शेतकरी उत्पादक कंपनी, ग्राम रोजगार सेवक, सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकारी प्रगत प्रमाणपत्र तसेच मधुमक्षिका पालन हे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. शहरी असो व ग्रामीण भागातील तरुण तरुणी, गृहिणी, शेतकरी, मजूर यांना यामध्ये प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी 10वी पास किंवा मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी ही परीक्षा पास असणे आवश्यक आहे.  तरी इछुक विद्यार्थ्यानी महाविद्यालयास 7083421122 या क्रमांक किंवा प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य तसेच केंद्रसंयोजक  यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here