खामगाव : विद्यालक्ष्मी पोर्टल वर शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला गेला. वडीलांवर शेती करत असल्याने नवे कर्ज मिळू शकत नसल्याचे त्यामुळे शैक्षणिक कर्जासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागत नक्षलवादी पडण्याची धमकी देणाऱ्या तरुणासाठी खामगाव अर्बन बँकेने कर्ज उपलब्ध करून देत एक प्रकारे मदतीचा हात दिला आहे.
त्या विद्यार्थ्यांनेही खचून न जाता समाजाच्या दातृत्वाचा साद घालण्याची हाक आपल्यासारख्या इतर अडचणीत असलेल्यांना दिली आहे.
दहा दिवसात शैक्षणिक कर्ज मिळावे अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी नाहीतर वर्षभरात नक्षलवादी बनुन दाखवेन असे खळबळ जनक पत्र बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील विद्यार्थी वैभव मानखैर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रामुळे खळबळ उडाली होती.
बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणारे बाबाराव मानखैर यांना दोन मूल आहे.मोठा प्रसाद व लहान वैभव. प्रसाद हा शेतीत वडिलांना मदत करतो तर वैभव हा बारावी नंतर धुळे जिल्ह्यातिल बोराड़ी येथील फार्मसी कॉलेजात बी. फार्मसी च्या दुसऱ्या वर्षात शिकतो. बारावी नंतर जवळ असलेल्या पैशाच्या मदतीने वडिलांनी वैभव ला फार्मसी शिक्षणासाठी टाकले. पहिल्या वर्षी वैभव ला चांगले मार्क्स ही पडले वैभव पुढील वर्षात गेला.पण या वर्षी शेतात काही पिकलच नाही म्हणून जवळ पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षाच शिक्षण थांबण्याची वेळ आली.म्हणून वैभव ने संग्रामपूर येथील बैंक ऑफ़ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यापूर्वी मोठ्या अपेक्षेने अर्ज केला होता. चार महिन्यात अनेकदा बँकेचे उंबरठे झिजवले . मात्र पदरी उपेक्षाच पडली. “तुमच्या वडिलांनी घेतलेल पिक कर्ज न भरल्याने तुम्हाला शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही” अस कारण देऊन वैभव च्या हातात बँकेचे पत्र पडले होते.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अर्बन बँकेने या विद्यार्थ्याला मदतीचा हात दिला आहे त्याची शैक्षणिक गरज कर्जरूपाने पूर्ण केली असून नुकताच त्याला बँकेच्या माधव सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात त्याला कर्जाची रक्कम सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात रा.स्व.संघाचे जिल्हासंघचालक बाळासाहेब काळे, विभाग कार्यवाह प्रल्हाद निमकर्डे, विभाग सहप्रचारक वैष्णव राऊत, जिल्हाकार्यवाह विजय पुंडे, बँकेचे संचालक सचिन पाटील, संचालिका फुलवंती कोरडे,राजेंद्रसिंह , बँकेचे प्रभारी प्रबंध संचालक पांडुरंग खिरोडकर तथा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक कर्ज मिळावे म्हणून पळापळ करत होतो. यात चीड आली.मानसिक खच्चीकरण झाले होते. परंतु आपला मार्गदेखील चुकला होता. त्यामुळे बोललेले शब्द मी मागे घेत आहे. समाजामध्ये दातृत्व आणि पुढे येणारे अनेक लोक आहेत. माझ्यासारख्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांनी, तरुणानी समाजातील दातृत्वाला साद घालण्याचा बहुमोल संदेशही वैभव या विद्यार्थ्याने दिला.