Home संग्रामपूर परिसर संग्रामपूर मध्ये पत्रकार दिन साजरा

संग्रामपूर मध्ये पत्रकार दिन साजरा

विविध क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील भाऊ भोजने यांच्या हॉटेल चार्वाक मध्ये संग्रामपुर पत्रकार संघ आयोजीक समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ९ रत्नाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणुन साजरी केली जाते. यानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागपुर येथील कवि लोकनाथ यशवंत हे होते तर व्यासपीठावर संपादक पुरुषोत्तम आवारे, संजय उमरकर, कवि प्रा शेषराव धाडे, प्रा विशाखा शिरसाट, कृषि अभियंता निलेश बढे , शाहिर उत्तमराव फुलकर यांची प्रमुख उपस्थीती होती यावेळी पुरुषोत्तम आवारे , यांची आदर्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर , डॉ बाबासाहेब आंबेडकर , पहिल्या मराठी संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला तर कवि लोकनाथ यशवंत, निलेश बढे , प्रा धाडे यांची समायोचित भाषणे झालीत यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार किशोर खडे, तरुण यशस्वी उद्योजक निपुल बिजवाडे , शुन्यातुन विश्वनिर्माण करणारे युवा उद्योजक जलील शेख , शेती पुरक उद्योजक उच्चशिक्षित युवक अभयसिंह मारोडे , जेष्ठ पत्रकार मिर मुज़फ्फर अली, स्वावलंबी अपंग युवक शेख जमीर शेख हारुण , समाज प्रबोधनकार शाहिर उतमराव फुलकर यांचा संग्रामपुर पत्रकार संघ आयोजीत समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी भाऊ भोजने यांची महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊ केली प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी केले तर संचालन अभयसिंह मारोडे यांनी केले.

कार्यक्रमाला पत्रकार श्रीधर ढगे पाटील ,अनुप गवळी, सुचित धनभर, युसुफ शेख , अनिस शेख, नारायण सावतकार , सागर  कापसे, अनिलसिंग चव्हाण, अजहर अली, शेख हमीद, मिर मकसुद अली , अमोल ठाकरे , सचिन पाटील ,दयालसिंग चव्हाण , राजेन्द्र ससाने , रमेश लहासे, विठ्ल निंबोळकार , अरविंद दहि , आदी पत्रकार बांधव उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here