Home राजकारण उमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर!

उमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर!

खामगाव :ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्राम पंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलं आहे. त्यात सरपंच पद हे सदस्यामधून असल्याने सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागले आहे. यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणीत असतात. असाच एक फंड जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एक उमेदवाराने आजमविला आहे. या उमेदवाराचे मुलाने चक्क निवडणून चिन्ह असल्याने ऑटोच घरावर नेऊन दर्शनी भागात ठेवला आहे.
निवडणून आली की उमेदवारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन क्लुत्या लढविल्या जातात. सद्या ग्रामपंचायत निवडणुकिंमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील प्रमुख पक्षाचे नेते निवडणुकीत लक्ष घालून असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच व्हावे यासाठी प्रयन्त करीत आहेत. त्यातच उमेदवार सुद्धा आपली ताकदपणाला लावून निवडणूक रिगणात उतरले आहेत. काही उमेदवार नवीन क्लुप्ती लढून मतदारांना एन केन प्रकारे आकर्षित करण्याच्या प्रत्यनात आहेत. खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील प्रगती प्यांनलच्या उमेदवार सौ. गीताबाई मनोहर रहाटे यांचे निवडणुक चिन्ह ऑटो असून त्यांच्या नातेवाईकांनी घराच्या छतावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवला आहे. हा ऑटो छतावर नेण्याकरीता केनची मदत घेण्यात आली. रात्रीच्या वेळी या ऑटोवर आकर्षक लाइटिंग लावल्याने ऑटो नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे. निवडणुकीचे चिन्ह ऑटो असल्याने ऑटो छतावर नेवून ठेवल्याने सर्व परिसरात उमेदवाराचे व ऑटो छतावर ठेवल्याची चर्चा रंगत आहे. आगळ वेगळ काही तरी नाविन्य पूर्ण करुन चर्चेत राहाण्याकरीता अनेक उमेदवार अशा युक्त्या वापरत असतात. खामगाव तालुक्यातील या उमेदवाराने छतावर ठेवलेला ऑटो पाहण्यासाठी गावातील नागरीक गर्दी करीतांना दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here