
शेगाव :
मराठा पाटील युवक समितीवतीच्या सोयरिक पुस्तिकेचे कर्मयोगी श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
दरवर्षी प्रमाने यावर्षीसुध्दा मराठा पाटील युवक समिती वतीने सोयरिक या उपवर युवक-युवती परीचय पुस्तिकेचे प्रकाशन कर्मयोगी श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षी कोरोणा संसर्गाने उद्दभविलेल्या परीस्तिस्थिमुळे प्रकाशन सोहळा साधेपणाने पार पडला. सर्वप्रथम समितीच्या वतीने कर्मयोगी भाऊंचा शाल व श्रीफळ देवुन हर्दिक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संपादक श्री. रमेश टिकार यांनी सोयरीक पुस्तिका तसेच समाजामध्ये पुस्तिकेची असलेली उपयुक्तता याविषयी भाऊंना माहीती दिली. मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. गजानन ढगे यांनी यावेळी समितीच्या कार्याचा आढावा आणी उपक्रमाबाबत माहीती विषद केली. सोयरिक पुस्तिका प्रकाशन हे अभिनंदनीय असुन समितीच्या कार्याला कर्मयोगी श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी समितीचे सचीव प्रा.डाॅ.योगेश म्हैसागर आदि उपस्थिती होते.