लक्ष्मीनारायण एफपिसी मध्ये तुरीची खरेदी करिता ऑनलाइन नोंदणी सुरू
खामगाव : महाएफपिसी पुणे व लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकर्यांचा शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडचे अधिकृत खरेदी केंद्राद्वारे ऑनलाइन नावनोंदणीस सुरवात झाली आहे. शेतकर्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी तलाठ्याने प्रामाणित केलेला सातबारा, पिकपेरा, आधार कार्डची सत्यप्रत, बँकेच्या पासबूकची सत्यप्रत व नोंदणीसाठी मोबाइल क्रमांकसह “लक्ष्मीनारायण” माँ जिजाऊ कॉम्प्लेक्स, एलआयसी समोर, नांदुरा रोड, खामगाव येथे किंवा 8600978569 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच ऑनलाइन नाव नोंदणीसाठी 7218919210 या व्हाटसअप्प क्रमांकावर कागदपत्रे सुद्धा पाठवून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तरी शेतकर्यांनी लवकरात लवकर आपल्या सोयाबीन विक्री साठी संपर्क साधावा असे आव्हान तेजेंद्रसिंह चौहान, संचालक लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्यूसर कंपांनीच्या वतीने करण्यात आले आहे.