Home Breaking News आ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश

आ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश

सन 2020-21 या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्हयातील एकुण 1419 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी जाहीर

खामगांव – जिल्हाभरात सन २०२०/२१ चा खरीप हंगाम पुर्णपणे नष्टं झाला असुन सततच्या पावसामुळे सर्वच पिके हातची गेली होती. शेतकरी मरणाच्या दारात उभा असतांना शासनाने त्याला शासकीय मदत, पिक विमा, सुपुर्ण सरसकट कर्जमाफी ५० पैशांच्या आत आणेवारी कमी करून जाहीर करा, तसेच त्वरीत पिक विमा व ईतर मदत मिळालीच पाहिजेत या मागणी साठी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष ऍड आकाश फुंडकर यांच्या आवाहनानंतर जिल्हाभरात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या चुनभाकर हया आंदोलनाचा धसका घेत आज खरीप हंगाम 2020-21 साठी पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांचा २०२०/२०२१ चा खरीप हंगाम सततच्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे पुर्णपणे नष्टं झाला असुन शेतकरी हा मरणाच्या दारात उभा असुन त्याला शासनाची आर्थीक मदत, काढलेला पीक विमा, न काढलेला पीक विमा, व दुष्काळाच्या सुखसोयीची आज खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे उळीद, मुग, ज्वारी, कापुस, मका, भुईमुंग, सोयाबीन, तुर, केळी, ऊस व फळबागा ह्या सततच्या व विक्रमी पावसामुळे हि पिके पुर्ण पणे नष्टं झाली असुन शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह व कौटुंबिक गरजा कशा पार पाडाव्या या विवंचनेमध्ये जिल्हयातील शेतकरी पडला आहे. बुलढाणा जिल्हा भाजपा वतीने आतापर्यंत ३ ते ४ आंदोलन करण्यात आली. शासनाने नजर आणेवारी ५० पैशांच्या वर काढली होती व आता डिसेंबर २०२० ची वस्तुनिष्टं आणेवारी ५० पैशाच्या आत काढावी अन्यथा भाजपाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते यापुढेही आंदोलने करतील त्यांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा देखील देण्यात आला होता.
इशारासरत्या वर्षात जिल्हाभरात मागील अनेक वर्षाच्या पावसाचा विक्रम मोडत सर्वाधिक पाऊस झाला होता. ह्यात अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे सर्व शेतीचे पुन्हा पंचनामे करू शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेले उत्पन्न पाहून 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी काढण्यात याव्या, व ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करण्यात यावी या मागणी साठी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी आंदोलने करुन शेतक-यांच्या हक्काची लढा सुरु ठेवला, जिल्हाभरात भाजपाच्या वतीने तहसिल कार्यालयांवर निवेदने देण्यात आली, तसेच सर्वात मोठे चुन भाकर हे आंदोलन करण्यात आले हया आंदोलनामुळे प्रशासन नमले असून जिल्हयाभरातील 1419 गांवाची अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here