अवैधरित्या गुटखा वाहतूक: तिघांना अटक
खामगाव – एसडीपीओ अमोल कोळी रुजू झाल्यानंतर ऍक्शन मोडवर आले असून खामगावकडून कंझाराकडे अॅपेव्दारे अवैधरित्या गुटखा घेवून जाणाऱ्या तिघांना एसडीपीओ पथकाने १७ ऑक्टोबर रोजी अटक केली असून गुटख्यासह २ लाख ८३ हजार ५१२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.
उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एसडीपीओ पथकाने बुलडाणा कंझारा रोडवरील विजयलक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ नाकाबंदी केली होती. दरम्यान खामगाव कडून कंझाराकडे अॅपे मालवाहक क्रमांक एमएच ३२ – बी ३६२३ जात असताना अॅपे थांबवून तपासणी केली असता अॅपेमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या विमल गुटख्याचा माल अवैधरित्या पांढऱ्या रंगाच्या पोतड्यांमध्ये मिळून आला. पोलिसांनी तात्काळ आरोपी शेख शोएब शेख आसिफ वय २० रा.कंझारा, शेख अफसर शेख बुढन वय ४६ रा.बर्डे प्लाँट खामगाव व मो.बाकीर शेख बुढन वय ३५ रा.कंझारा या तिघांना ताब्यात त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपरोक्त आरोपींकडून पोलिसांनी विमल गुटख्याचे २२ पोते किं. १ लाख ७८ हजार ८८९ रूपये, सुगंधित तंबाखू २२ पोते किं. ३४ हजार ६३२ रूपये, अॅपे किंमत ७० हजार असा एकुण २ लाख ८३ हजार ५१२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ पथकातील सपोनि रविंद्र लांडे, सुधाकर थोरात, अमित चंदेल, शांताराम खाळपे, सचिन लोंढेकर यांनी केली.