विठ्ठल निंबोळकर
संग्रामपुर– येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडपास निधी असून सुध्दा बांधकामास मंजुरात मिळाली नाही या कामास त्वरित मंजुरात द्या अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा उदेभान दांडगे यांनी नगरपंचायतचे मुध्याधिकारी यांना निवदेनाद्वारे दिला होता.परंतु दिलेल्या दिनांका पर्यत मंजुरात मिळाली नाही .त्यामुळे त्यांनी आज दि.१२/आक्टोबर पासून नगरपंचायत समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
निवेदनात नमुद की, संग्रामपुर येथील श्री अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रखडलेले कामातील वार्ड क्रमांक ७ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागेवर सभागृह व सभामंडप बांधकाम मंजूर निधी असून सुद्धा अद्यापपर्यंत बांधकाम झाले नाही तरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत 2019-20 अंतर्गत तात्काळ बांधकाम 10 ऑक्टोबर पर्यंत बांधकामास मंजुरात न दिल्यास १२ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारादिला होता. असे उदेभान दांडगे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आले आहे. हया निवेदनात संग्रामपुरातील वार्ड क्र २,३ व ७ मधील नागरिकांनी पाठींबा दर्शविले आहे.तरीही दिलेल्या दिनांका पर्यंत संबधिताकडून मंजूरात मिळाली.त्यामुळे संग्रामपूर येथील नागरिक उदेभान दांडगे हे आजपासून नगरपंचायत समोर आमरण उपोषणास बसले आहेत.संध्याकाळ पर्यत संबंधित विभागाचे अधिकारी ,कर्मचारी यांनी तसेच कोणत्याही पदाधिकारी यांनी भेट दिली नाही.