Home Breaking News करमोळा येथील साई धाब्यावर 125 ब्रास अवैद्य मुरूम जप्त

करमोळा येथील साई धाब्यावर 125 ब्रास अवैद्य मुरूम जप्त

जप्त करण्यात आलेला मुरूम

तहसीलदार चव्हाण यांची धाडसी कारवाई

विठ्ठल निंबोळकर

संग्रामपूर : तालुक्यामध्ये कोठेही अवैद्य गौण खनिज मुरूम साठा असल्यास संग्रामपूर तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान तहसीलदार यांनी केले आहे संग्रामपुर ता प्र। तालुक्यातील करमोळा येथील साई झाडाच्या जागेतून अंदाजे सव्वाशे ब्रास कच्चा मुरूम साठा जप्त करण्यात आला ही कारवाई 2 ऑक्टोंबर रोजी संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली करमोळा येथील जळगाव जामोद सोनाला रोडवर असलेल्या शिवशंकर सुधाकर गावंडे यांच्या मालकीच्या असलेल्या गट क्रमांक 18 मधील साई धड्याच्या जागेत आवारात 125 ब्रास कच्चा मुरूम साठा करण्यात आला होता या घटनेची माहिती तहसीलदार चव्हाण यांना मिळाल्यावरून त्यांनी करमाळा येथील मंडळ अधिकारी बिल तलाठी गाणे यांना घटनास्थळावर पाठवून सदर कच्चा मुरूम बाबत शिवशंकर गावंडे यांना परवाना बाबत विचारणा केली मात्र त्यांच्याकडे या अवैध कच्चा मुरमा बाबत कोणताही परवाना नसल्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अवैध कच्चा मुरमाचा साठ्याचा पंचनामा करून तसेच जप्ती नामा करून करमाळा येथील पोलीस पाटील वरगे यांच्या ताब्यात देऊन कारवाई केली महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती साठा तसेच अवैध मुरूम साठा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत सदर प्रकरणात यापुढे काय कारवाई होते याबाबत तालुका वासियांचे लक्ष लागलेले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here