Home Breaking News मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप

मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप

खामगांव शहर व तालुका काॅंग्रेस कमिटीचा उपक्रम

खामगाव: अ.भा.राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे महासचिव , माजी केंद्रिय मंत्री मुकूलजी वासनिक यांचा वाढदिवस 27 सप्टेंबर 2020 रोजी विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमितत खामगांव शहर व तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीटे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डाॅ.सौ.तब्बसुम हुसैन, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेवक शेख फारुख बिसमिल्ला, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, खामगांव विधानसभा युवक काॅंगे्रस अध्यक्ष मंगेश इंगळे, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण टिकार, माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर, पं.स.चे माजी उपसभापती चैतन्य पाटील, रामकृष्ण पाटील, निलेश देशमुख, जितेंद्र देशमुख, स्वप्नील संजय ठाकरे, जसवंतसिंग शिख, अन्सारभाई, जयरा मुंडाले, आशिष देशमुख, सागर मुयांडे पाटील, उत्तम माने, बिलाल खाॅ पठान,अनंता सातव यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी मुकूलजी वासनिक साहेब यांना दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सदैव जनसेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त करत खामगांव मतदार संघातील काॅंग्रेसजणांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचा विजय असो, मुकूलजी वासनिक आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here