Home मराठवाडा आकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी!

आकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी!

जालना: मातृशक्ती संघटनेच्या नुकत्याच झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत जालना येथील कुमारी आकांक्षा सराटे हिची मातृशक्ती संघटनेच्या मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली मातृशक्ती संघटनेच्यावतीने आकांशा सराटे हिने जालना अध्यक्ष या नात्याने महिला हितासाठी आणि पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने बेटी बचाव बेटी पढाव महिलांसाठी आरोग्य शिबीर वृक्ष लावा वृक्ष जगवा आदी विविध उपक्रम राबून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठवाडा विभागात मातृशक्ती संघटनेच्या कार्यविस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांची मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली सौ राजश्री राजकुमार व्यास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांनी कुमारी आकांक्षा सराटे हिची वरील प्रमाणे निवड केली या बैठकीला मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ अर्चना ताई ठाकरे पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रुपाली ताई वानखडे राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख राष्ट्रीय सहसचिव माधुरीताई शर्मा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ मुक्ताताई ठाकूर राष्ट्रीय संघटक सौ लीना ताई भारंबे ज्येष्ठ सदस्य सौ गीता ताई वाघ सौ रेखा प्रशांत शेळके आदी उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here