Home Breaking News मराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी!

मराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी!

वऱ्हाडाच्या मातीतील हा अधिकारी बनलाय महाराष्ट्र एटीएस प्रमुख!

अकोला: मुळचे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पारस येथील रहिवासी असलेले शिवदीप लांडे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. त्यांना सुरवातीला अमलीपदार्थ विरोधी पथकात नेमण्यात आले. त्यांची तेथून बदली करण्यात आली असून आता दहशतवाद विरोधी पथक प्रमुख त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्याचे सुपुत्र

शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग हे नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चिडीमाराना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला. लाच घेणाऱ्या पोलिसाला स्वतःच वेष बदलून पकडून दिले. अनेक साहसी आणि धडक कारवाई त्यांनी केलेल्या आहेत. अशा अनेक बाबींमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रातही त्याना अशास धडक पद्धतीने काम करता येईल, अशी त्यांच्या चाहत्यांची अक्षा आहे.

दबंग, सिंघम असा बोलबाला

शिवदीप वामनराव लांडे 2006 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख बनले आहेत. यापूर्वी त्यांनी बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. पाटणा (मध्य प्रदेश) चे एसपी म्हणून त्यांचा कार्यकाळ बराच लोकप्रिय होता. बर्‍याच गुन्हेगारांना अटक केली आणि गुन्हेगारांवर कारवाई केली. शिवदीप लांडे यांना प्रेमाने प्रेक्षकांनी ‘दबंग’, ‘सिंघम’ आणि ‘द सुपरकॉप’ अशी अनेक नावे दिली आहेत.

———————————————-

शिवदीप लांडे यांचा अल्प परिचय

जन्म 29 ऑगस्ट 1976

गाव – पारस अकोला, महाराष्ट्र

शिक्षण: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव विद्यापीठाच्या बीई (इलेक्ट्रिकल) नंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ते सामाजिक कामात नेहमी पुढाकार घेतात. गरीब मुला मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करतात आणि कोचिंग वर्ग, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here