Home विदर्भ तोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार!

तोंड दाबून ओढत नेले, आणि चार नराधमांनी केला तिच्यावर अत्याचार!

जळगाव जामोद  : तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना १८ सप्टेबर रोजी रात्री घडली. पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.

पिडित अल्पवयीन मुलगी व तीच्या चुलतभावाने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मुलगी शौचास गेली असता, सागर मांडोकार, टील्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (वय २२ वर्षे), संदिप वसंता जवंजाळ (वय २७ वर्षे), ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे (वय ३५ वर्षे) सर्व रा. मडाखेड खुर्द यांनी मुलीला गाठले. ज्ञानेश्वर शित्रे याने मुलीचे तोंड दाबले. चौघांनी तीला मातीच्या मंदिराकडे ओढत नेले. या ठिकाणी ज्ञानेश्वर शित्रे याने मुलीचे तोंड दाबून टील्याने हात पकडले. यानंतर आळीपाळीने सामुहिक अत्याचार करण्यात आला. यादरम्यान संदीप वसंता जवंजाळ याने पाळत ठेवली. ज्ञानेश्वर शित्रे याने मुलीला घरच्यांना सांगितले तर मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्व तिथून निघून गेले. अशा आशयाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी भादविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (डीए), ३७६ (२ ) (जे) ( एन) ३६३, १०९, ५०६, सहकलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी टील्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे, संदिप वसंता जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे सर्व रा. मडाखेड खुर्द यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली. सागर मांडोकार हा शनिवारी सायंकाळपर्यंत फरारच होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, गणेश पाटील, सचिन राजपूत हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here