Home विदर्भ वरवट, तेल्हारा रस्ता बनला ‘मूत्यू मार्ग’

वरवट, तेल्हारा रस्ता बनला ‘मूत्यू मार्ग’

भाऊ भोजने यांचा आंदोलनाचा पवित्रा

स्पेशल रिपोर्ट/ विठ्ठल निंबोळकर,

 

संग्रामपूर : कित्येक वर्षांपासून वरवट बकाल ते तेल्हारा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. परिणामी अपघाताच्या घटना वाढल्या असून अनेकांना दुखापत झाली आहे या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्रामपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाऊ भोजने यांनी दिला आहे
वरवट ते तेल्हारा या रस्त्याचे काम रखडले आहे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून सुद्धा बांधकाम विभाग कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वरवट बकाल येथून तीन किलोमीटर अंतरावर काकनवाडा हे गाव आहे. या गावातील विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तर नागरिक खरेदी, विक्री चे व्यवहार करण्यासाठी वरवट बकाल येथे दररोज ये-जा करता. येथे त्रंबकेश्वर संस्थान हे प्राचीन असल्याने येथे भक्तांची गर्दी असते तसेच भाविकांच्या दिंड्याची वर्दळ सुरू असते. मागील कित्येक वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाला असल्याने भाविकांना खूप त्रास होत आहेबयेथून अकोला जिल्ह्यात जाण्याचा मार्ग आहे या रस्त्यावरून प्रवास करतांना नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. जळगाव जा. तेल्हारा, अकोट, अमरावती, हिवरखेड आदी बसेस या मार्गावरून धावतात. मागील 5 महिन्यापासून ठेकेदाराने हा रस्ता खोदून टाकला असून या ठेकेदाराकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत या रस्त्यावर अनेक छोटेमोठे अपघात झाले असून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वटवट बकाल तेल्हारा रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे. हा रस्ता रखडला असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत.त्वरित रस्ता काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– भाऊ भोजने 
प्रेस क्लब अध्यक्ष संग्रामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here